आरोग्य

घरगुती गॅसचा (LPG) सुरक्षित वापर करणे ही सध्याच्या काळात आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी काळाची गरज….. दीपक जगताप

घरगुती गॅसचा (LPG) सुरक्षित वापर करणे ही सध्याच्या काळात आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी काळाची गरज..... दीपक जगताप

वेगवान मराठी/ एकनाथ भालेराव

पंतप्रधान एलपीजी पंचायत कार्यक्रमांतर्गत येवला तालुक्यातील सायगाव येथे नुकताच एलपीजी पंचायत कार्यक्रम संपन्न झाला.हा उपक्रम देशभर राबविण्यात येत असून, येवला तालुक्यातील अंदरसूल येथील मे. भिमाई इंडेन ग्रामीण गॅस एजन्सीचे संचालक दीपक जगताप यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमात गॅसचा सुरक्षित वापर, गॅसची बचत, गॅस सिलिंडर बदलण्याची पद्धत, गॅस संच योग्यरीत्या लावणे व पेटवणे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच मोबाईल फोनद्वारे गॅस सिलिंडर बुकिंग कशी करावी, याचेही प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. संचालक दीपक जगताप व सुनील कुळधर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मे. भिमाई इंडेन ग्रामीण वितरक, अंदरसूल यांच्या वतीने आयोजित या एलपीजी पंचायत कार्यक्रमात विशेषतः महिलांना गॅस वापरताना घ्यावयाच्या सुरक्षितता उपायांची माहिती देण्यात आली. फायर बॉलमुळे होणारे अपघात कसे टाळता येतील, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास देविदास जानराव, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब अहिरे, बाळासाहेब बोराडे, बाबासाहेब कुळधर, विनोद आव्हाड, सुभाष आव्हाड, विजय आव्हाड, भागीनाथ कांबळे, अरुण आव्हाड, अनिल आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय मंदा आव्हाड, शिंधू आव्हाड, भारती कांबळे, मंदा कांबळे, पूजा आव्हाड, भागूबाई कांबळे, सविता आव्हाड, सरला कांबळे, नंदा आव्हाड, सारिका आव्हाड, विठाबाई कांबळे, संगीता अहिरे, कविता आव्हाड, लता आव्हाड, भारताबाई कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी कार्यक्रमाला उपस्थिती नोंदवली.

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!