नाशिक ग्रामीण

मॉर्निंग वॉकसाठी जाणऱ्या महिलांना चार चाकी वाहनाची धडक एक जागीच ठार तर चार जखमी मुंजवाड-खमताणे रस्त्यावरील घटना

मॉर्निंग वॉकसाठी जाणऱ्या महिलांना चार चाकी वाहनाची धडक  एक जागीच ठार तर चार जखमी

मुंजवाड-खमताणे रस्त्यावरील घटना

वेगवान नासिक / तुषार रौंदळ

विरगाव दि. 14 ऑगस्ट 2025 :-

भरधाव वाहनाने पहाटेच्या सुमारास नियमितपणे फिरण्यासाठी जाणाऱ्या महिलांना उडविल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तीन महिला जखमी झाल्या असून एकाची प्रकृती चितांजनक असल्याची घटना मुंजवाड-खमताणे मार्गावर  गुरूवार दि. १४ रोजी सकाळी घडली.

मुंजवाड येथील डॉ. राजेंद्र जाधव यांच्या पत्नी सौ. सरला जाधव,सुनंदा वसंत जाधव, संगिता ज्ञानेश्वर जाधव, अजंना खुशाल पगार व वसंत त्र्यंबक जाधव हे नेहमीप्रमाणे पहाटे मार्निंग वॉक साठी मुंजवाड येथून खमताणे रस्त्यावर जात असत. आज गुरूवार दि. १४ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास खमताणे रस्त्यावरील माजी जि.प.सदस्य शैलेश सुर्यवंशी यांचे मळयाजवळ पाठीमागून (खमताणेकडून) येत असलेल्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली.

या अपघातात डॉ.राजेंद्र जाधव यांच्या पत्नी श्रीमती. यात सरला जाधव (48) यांचा जागीच मृत्यू झाला तर सुनंदा जाधव (52), संगिता जाधव (48), अजन्ना पगार (45) आणि वसंत जाधव (58) जखमी झाले. नीलेश सूर्यवंशी, हेमलता सूर्यवंशी, राजेंद्र जाधव, भिका जाधव, संजय जाधव, सुधाकर खैरनार, अरुण जाधव यांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदत केली.

रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या घटनेने मुंजवाडसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चारचाकी वाहनासह चालक फरार असून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सौ. सरला जाधव यांच्यावर दुपारी १ वाजता मुंजवाड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

तुषार रौंदळ

पत्रकारिता क्षेत्रात गेल्या २५वर्षापासुन असुन मी दैनिक लोकमत, दैनिक सकाळ, दैनिक दिव्य मराठी,दैनिक गावकरी, दैनिक आपलं महानगर यात पत्रकारिता केली असुन मला राजकीय, सामाजिक आर्थिक, पौराणिक ऐतिहासिक,कला क्रीडा यांचा सखोल अभ्यास केला असुन ते वेळोळी माझ्या लेखणीतून दिसली आहे.तसेच सोशल मीडिया,युटुब चॅनल वर चा मला १०वर्षाचा अनुभव आहे. तुषार रौंदळ हे बागलाण तालुक्यातील सटाणा येथून वेगवान नाशिक चे प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!