Uncategorizedलोकल बातम्या
माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसा निमित्ताने दिव्यांगाना मिष्टान्न भोजणाची मेजवानी

मनोज वैद्य/देवळा
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या आज 5 ऑगस्ट रोजी असलेल्या वाढदिवसाचे औचित्य साधत नाशिक जिल्हा जितेंद्र आव्हाड युवा मंचचे जिल्हाध्यक्ष सचिन सूर्यवंशी यांच्या वतीने सटाणा येथील काकासाहेब भामरे निवासी दिव्यांग शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना मिष्ठांन सुरुची भोजनाची मेजवानी देण्यात आली.
तसेच फळे व शैक्षणिक साहित्याचे देखील वाटप करण्यात आले. यावेळी सचिन सूर्यवंशी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे देवळा तालुका अध्यक्ष पंडित बापू निकम, अरुण कृष्णा सोनवणे, केशव मांडवडे, सविता गिरी, अमित कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरवर्षी जितेंद्र आव्हाड युवा मंचच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत विविध विद्यार्थी उपयोगी व समाज उपयोगी उपक्रम राबविले जात असल्याने सदर मंचेचे सर्वत्र कौतुक होत आहे.




