लोकल बातम्या

फिट आल्याने कपडे धुत असताना महिलेचा पाण्यात पडुन मृत्यू…

Woman dies after falling into water while washing clothes due to a fit...

वेगवान मराठी  / भाऊसाहेब हांडोरे

.दि. 25=नोव्हेंबर 2025 — सिन्नर तालुक्यातील शहा येथे एक दुर्दैवी घटना घडली असून विवाहितेचा कपडे धुत असताना पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या अकस्मात मृत्यूची बातमी वा- यासारखी परिसरात पसरली व एकच आक्रोश करत कुटुंबातील सदस्यांनी टाहो फोडला.
सदर घटना ही सोमवार दिनांक 24 रोजी सकाळी 11 च्या दरम्यान घडली असून परिसरात हळूहळू व्यक्त होत आहे.
शहा येथील राहुल वाघचौरे यांची धर्मपत्नी सौ विजया वय ‌25 . वर्षे. असून सदर मृत विजया वाघचौरे यांच्या पश्चात पती .सासू व दोन लहान मुले असा परिवार आहे.या परिवारवर अचानक झालेल्या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळूहळू व्यक्त होत आहे सदर महिलेला त
त्वरित रूग्णालयात प्रमाणात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले आहे.
सौ.विजया यांना फिट. येत होते.. अशी चर्चा आहे.या वेळी सुद्धा सदर महिला ही घराजवळ असलेल्या पाण्याच्या चारीवर कपडे ( धुनं ) धुण्यासाठी गेली होती.. कपडे धुत असताना अचानक तिला फिट आले. ती. त्याच पाण्यात पालथ्या अवस्थेत पडून राहिलो.. जास्त वेळ पाण्यात पडुन राहिल्यामुळे तीच्या नाकातोंडात पाणी शिरले व तिचा जागीच मृत्यू झाला… सदर घटना घडल्यानंतर गावातील एक व्यक्ती जवळुन चालली असता सदरील प्रकार उघडकीस आला.. कपडे.बादली.व इतर वस्तू चारीवर पडले आहे परंतु क़ोणीच दिसत नाही म्हणून पाण्यात डोकावून पाहिले असता एक महिना पाण्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आले.. त्यांनी ताबडतोब या घटनेची माहिती जवळपास असलेल्या लोकांना दिली.. त्यावेळेस सदर प्रकार उघडकीस आला… घटना दुर्दैवी असुन मृत महिलेवर शेवविच्छदन करून सायंकाळी उशिरा तीच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले…

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!