नाशिक ग्रामीण

कौतिकपाडे औंदाणे नागरीकांचा कर्जमाफीसाठी मतदानावर बहिष्कार, शेतकऱ्यांच्या विविध मागण्या; भावना तीव्र

वेगवान नासिक / तुषार रौंदळ

विरगाव दि. 11 ऑगस्ट 2025 :-

केंद्र व राज्य शासन कर्जमाफीसह अन्य मागण्यांसंदर्भात प्रत्यक्षात कार्यवाही करीत नाही, तोपर्यंत आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय तालुक्यातील औंदाणे, कौतिकपाडे, सुकड नाला परिसरातील ग्रामस्थांनी घेतला.

कर्जमाफीचे आश्वासन दिल्यानंतरही त्याची पूर्तता झालेली नाही. शेतकऱ्यांना २४ तास अखंड वीजपुरवठा मागणी वास्तवात आलेली नाही. शेतकरी आत्महत्या प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत.

शासन स्तरावरील वेगवेगळे अनुदान, पीकविमा नियमित मिळत नाही. यासंदर्भात विचार विनिमयासाठी औंदाणेत झालेल्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रहारचे जिल्हा सरचिटणीस तुषार खैरनार, माजी सभापती चिला निकम, विलास देवसन निकम, विलास महादू निकम, मनोहर निकम, अनिल देवरे, प्रवीण निकम आदींसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

तुषार रौंदळ

पत्रकारिता क्षेत्रात गेल्या २५वर्षापासुन असुन मी दैनिक लोकमत, दैनिक सकाळ, दैनिक दिव्य मराठी,दैनिक गावकरी, दैनिक आपलं महानगर यात पत्रकारिता केली असुन मला राजकीय, सामाजिक आर्थिक, पौराणिक ऐतिहासिक,कला क्रीडा यांचा सखोल अभ्यास केला असुन ते वेळोळी माझ्या लेखणीतून दिसली आहे.तसेच सोशल मीडिया,युटुब चॅनल वर चा मला १०वर्षाचा अनुभव आहे. तुषार रौंदळ हे बागलाण तालुक्यातील सटाणा येथून वेगवान नाशिक चे प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!