नाशिक ग्रामीण

निफाड तालुक्यात बिबट्याची दहशत संपता संपेना ; ग्रामस्थांच्या धाडसामुळे दोन बछडे जेरबंद ; प्रौढ बिबटे मात्र गायब..

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद, दि.२७ जानेवारी :- निफाड तालुक्यातील मानोरी खुर्द परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील कैलास शेळके यांच्या गट क्रमांक १२९ मधील शेतात एका मादी बिबट्याने आपल्या बछड्यांसह ठाण मांडल्याचे समोर आले. मात्र, ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवत वनविभागाच्या मदतीने तीनपैकी दोन बछड्यांना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
कैलास शेळके यांच्या शेतात पिकाची कामे सुरू असताना बिबट्याचे दर्शन झाले. मादी बिबट्या आपल्या तीन बछड्यांसह परिसरात वावरत असल्याचे लक्षात येताच परिसरात खळबळ उडाली. बिबट्या मादी आक्रमक पवित्र्यात असल्याने शेतमजुरांमध्ये आणि परिसरात घबराट पसरली होती. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. मादी बिबट्या पिकाच्या दाट आडोशाचा फायदा घेऊन पसार झाली, मात्र तिचे तीन बछडे तिथेच अडकले होते. ग्रामस्थांनी अतिशय शिताफीने आणि एकजुटीने शोध घेत तीनपैकी दोन बछड्यांना पकडून जेरबंद केले.

* ड्रोनच्या साहाय्याने मादीचा शोध सुरू
घटनेची माहिती कळताच येवला प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे, विंचूरचे वनरक्षक विजय दोंदे, गोपाल राठोड, पंकज नागपुरे, निफाडचे आधुनिक पथक सदस्य भारत माळी, सागर दुसिंग, विजय माळी, राहुल ताटे, असिफ पटेल, सुनील भुरुक यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन बछडे हाती लागले असले तरी, तिसरा बछडा आणि मुख्य म्हणजे मादी बिबट्या अद्याप परिसरातच दडून बसलेली आहे. मादी बिबट्या बिथरलेली असल्याने ती अधिक हिंसक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वनविभागाने तातडीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला असून, ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने उसाच्या आणि इतर पिकांच्या शेतात मादीचा शोध घेतला जात आहे.

* मादी बिबट्या अद्याप सापडलेली नसल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांनी शेतात जाताना सावधगिरी बाळगावी. एकटे न जाता समूहाने जावे आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी
विजय दोंदे
वनरक्षक विंचूर

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!