नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी 10 आणि 20 नगरसेवक जागेसाठी 70 नामांकन पत्र दाखल
Nondgaon News
वेगवान मराठी मारूती जगधने
” दि 18 नोव्हेंबर 2025 ”
नांदगाव नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी नामांकन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस 17 नोव्हेंबर होता. या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी एकूण 10 नामांकन पत्रे दाखल झाली. तर नगरसेवक पदासाठी उमेदवारांकडून 70 नामांकन पत्रे सादर करण्यात आली. नामांकन दाखल करण्यासाठी दिवसभर उत्साहाचे वातावरण दिसून आले असून पुढील तपासणीनंतरच अंतिम अर्जांची संख्या स्पष्ट होणार आहे.नांदगाव नगरपालिका निवडणुकीमध्ये बंडखोरी होऊ नये म्हणून यासाठी दक्षता पाळण्यात आली या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने सर्वाधिक उमेदवार दाखल झालेले आहे तर अनेकांनी पक्षाच्या उमेदवारी बरोबर अपक्षाचे देखील उमेदवारी दाखल केले आहे त्यामुळे नगरसेवक पदासाठी किंवा नगराध्यक्षपदासाठी अंतर्गत बंडाळी किंवा बंडखोरी होण्याची शक्यता वर्तविले जाते .नामांकन पत्र छाननी आणि माघारी नंतर खरे चित्र स्पष्ट होईल .या नामांकन पत्रामध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस या पक्षाचेवतीने नामांकन पत्र दाखल झालेले आहेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वतीने या ठिकाणी नामांकन पत्र दाखल झालेले नाही ?.
नांदगांव नगरपालिकेचे उमेदवारप्रभाग क्रमांक एक अ
पवार हिराबाई अर्जुन ( अपक्ष ),जगताप कल्पना वाल्मीक (शिवसेना ),मोरे गौतमी कुणाल (एन सी पी, )
प्रभाग क्रमांक दोन ब चे उमेदवार
शिंदे सतीश बाळासाहेब ( भाजप ) पेहेरे कमलेश पोपट (एनसीपी ),अहिरे सतीश प्रल्हाद (अपक्ष )
: तेलोरे कपिल रघुनाथ ( एनसीपी ) टिळेकर वाल्मीक हरिदास ( शिवसेना )
प्रभाग क्रमांक दोन अ पांडव दीपक प्रमोद (शिवसेना )पगारे मंगेश भगीरथ ( अपक्ष )
प्रभाग क्रमांक दोन ब शाहिस्ता माजिद सय्यद ( एनसीपी ) शाहिस्ता माजिद सय्यद (अपक्ष) नावंदर स्वाती अमोल (शिवसेना )
प्रभाग क्रमांक तीन अ -साक्षी अहिरे विश्वास (एनसीपी ) चोपडे रूपाली मनोज ( एनसीपी ) चोपडे रूपाली मनोज (अपक्ष) कसबे विद्या अभिमान (शिवसेना ) अहिरे साक्षी विश्वास (अपक्ष ‘ )
प्रभाग क्रमांक तीन ब गांगुर्डे राजाराम तुकाराम ( भाजप ) गांगुर्डे राजाराम तुकाराम (अपक्ष) ‘कदम उल्हास प्रकाश ( एनसीपी ) देवकाते सचिन अशोक ( एनसीपी ) देवकाते सचिन अशोक (अपक्ष ) शिंदे राजेश भागवत (शिवसेना ) शिंदे बिरू भाऊराव (अपक्ष ) कदम उल्हास प्रकाश (अपक्ष) वाघ संतोष धनाजी (शिवसेना ठाकरे गट ) तांबे नामदेव पंढरीनाथ ( अपक्ष )
‘प्रभाग क्रमांक चार मोकळ शोभा राजेंद्र ( एनसीपी ) सोर मंगला राजेंद्र ( अपक्ष )खरोटे योगिता सचिन ( शिवसेना ) .
प्रभाग क्रमांक चार ब कासलीवाल पवन तिलोकचंद ( अपक्ष )मोकळ राजेंद्र रामभाऊ ( एनसीपी ) मोकळ राजेंद्र रामभाऊ (अपक्ष) छाजेड दत्तराज रमणलाल ( भाजप ) कासलीवाल शोभा नेमीचंद ( शिवसेना ) संत प्रकाश राजकुमार (अपक्ष)
प्रभाग क्रमांक पाच अ देहाडराय सिंधुबाई हिरामण ( एनसीपी ) पाटील स्नेहल सुरज ( शिवसेना )
प्रभाग क्रमांक पाच ब शेख सईद रशीद (शिवसेना )सोनार योगेश अरुण (एनसीपी )
प्रभाग क्रमांक सहा अ
देवरे किरण जयप्रकाश ( शिवसेना ) कवडे विक्रांत चंद्रशेखर ( शिवसेना )कवडे विक्रांत चंद्रशेखर (अपक्ष)
प्रभाग क्रमांक सहा ब
हिरे माधुरी सागर (शिवसेना ) कासलीवाल शोभा नेमीचन ( शिवसेना )कवडे वंदना चंद्रशेखर (अपक्ष )कवडे वंदना चंद्रशेखर (शिवसेना )
प्रभाग क्रमांक सात अ
शेवरे गोपाळा बाळू ( शिवसेना ) शेवरे गोपाळा बाळू (अपक्ष )शेवरे गोपाळा बाळू ( शिवसेना ) सूर्यवंशी पुंजाराम तुळशीराम (एनसीपी )
प्रभाग क्रमांक सात ब
भगत दर्शना सोमनाथ ( एनसीपी )
काकडे मनीषा यशवंत (अपक्ष) काकडे मनीषा यशवंत ( शिवसेना )
पाटील रूपाली चेतन ( शिवसेना )
प्रभाग क्रमांक आठ अ
देहाडराय विष्णू रमेश ( एनसीपी )
पाटील पृथ्वीराज शिरीष (शिवसेना )
प्रभाग क्रमा क
आठ ब
खान जुबेदावी गफ्फारखान ( शिवसेना ) 8 ब मध्ये एकमेव उमेदवार आहे .
प्रभाग क्रमांक 9 अ
बेग निलो मुक्तार ( एनसीपीबॅग ) सलीम गफ्फार (अपक्ष )थोरात अजय गंगाधर ( अपक्ष ) सोळसे काका वनाजी ( शिवसेना )जाधव अनिल बाबुराव ( एनसीपी ) थोरात अजय गंगाधर (शिवसेना , ) जाधव रोहित मधुकर (काँग्रेस )
प्रभाग क्रमांक 9 ब सोळसे राणी सुनील (काँग्रेस )थोरात लहानुबाई प्रकाश ( अपक्ष ) हिरे माधुरी सागर (शिवसेना )जाधव राखी महावीर (शिवसेना )
प्रभाग क्रमांक दहा अ
शिंदे गायत्री प्रकाश (शिवसेना )
पगार सुनील काळू ( काँग्रेस )
प्रभाग क्रमांक दहा ब
सानप संजय बबनराव (भाजप ) राजोळे विलास रामभाऊ ( अपक्ष )देशमुख काशिनाथ फकीरा (अपक्ष )शिंदे प्रकाश कचरू (शिवसेना ) गुप्ता संतोष मधुकर (शिवसेना ठाकरे गट ) पांडुरंग मधुकर ( काँग्रेस )
नांदगाव येथे दिनांक 17 नोव्हेंबर रोजी नामांकन पत्र दाखल करताना यावेळी दहा व्यक्तींनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केली यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये संजय सानप (भाजप )सागर मदनराव हिरे ( शिवसेना ) कवडे राजेश रामराव (शिवसेना )पाटील अरुण शंकरराव (शिवसेना ) मोकळ धीरज राजेंद्र (अपक्ष) बनकर राजेश भीमराव (राष्ट्रवादी काँग्रेस ) कवडे विक्रम चंद्रशेखर (अपक्ष )देवरे किरण जयप्रकाश (शिवसेना ) गुप्ता संतोष मधुकर (शिवसेना ठाकरे गट ) आणि कवडे राजेश रामराव ( अपक्ष )असे एकूण दहा उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केलेले आहे आणि बाकी इतर उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांनी 70 नामांकन पत्र दाखल केलेले आहे येत्या माघारी नंतर खरे चित्र स्पष्ट होईल
नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून चार उमेदवारांनी नामांकन पत्र दाखल केले यापैकी आता कुणाची या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी वर्णी लागते यावर बहुतांशी नगरसेवकांचे भवितव्य देखील अवलंबून आहे .



