नाशिक ग्रामीण

मालेगावात टाटा कंटेनरमधून 53 जनावरांची सुटका; 8 जनावरांचा मृत्यू

Malegaon news

मालेगावात टाटा कंटेनरमधून 53 जनावरांची सुटका; 8 जनावरांचा मृत्यू

मालेगांव पोलिसांची कामगिरी

वेगवान मराठी : मारूती जगधने

दि .  9 सप्टेंबर 2025
मालेगाव पोलिसांनी केलेली कारवाई ही केवळ जनावरांची सुटका नाही, तर कायद्याची कठोर अंमलबजावणी असल्याचे दिसते. बेकायदा कत्तलखाने व निर्दय वाहतुकीमुळे जनावरांवर होणाऱ्या अमानुष अत्याचारांना हा मोठा धक्का आहे. आठ जनावरांचा मृत्यू ही दुःखद बाब असली तरी उर्वरित जनावरांचे प्राण वाचवले गेले, ही या मोहिमेची सकारात्मक बाजू आहे.
या घटनेवरून पुन्हा एकदा स्पष्ट होते की, प्राणीसंवर्धन व संरक्षणाचे कायदे केवळ कागदावर न राहता कठोरपणे राबवले गेले, तरच समाजात जनावरांविषयी संवेदनशीलता 

मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील चिखलओव्होळ शिवार येथे पोलिसांनी छापा टाकून कंटेनरमधून 53 गोवंश जनावरे ताब्यात घेतली. यापैकी 8 जनावरांचा मृत्यू झाला आहे. आरोपींनी ही जनावरे कत्तलीसाठी निर्दयतेने व विनापरवाना वाहतूक केली होती. वाहनासह एकूण ₹35 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.सदर कंटेनरच्या डबल तालामध्ये कोण कोण भरलेली होती .त्यामुळे त्यात काही जनावरांचा मृत्यू झालेला आहे हे भयानक दृश्य समोर आले .

मालेगाव | मुंबई-आग्रा महामार्ग क्र. 03 वरील चिखलओव्होळ शिवार येथील हॉटेल ग्रीनप्लाझा समोर पोलिसांनी छापा टाकून टाटा कंपनीचे कंटेनर (क्र. HR 67 B 3613) मधून विनापरवाना व निर्दयतेने बांधून नेण्यात येत असलेली 53 गोवंश जनावरे ताब्यात घेतली. यामध्ये 8 जनावरांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .

वरिष्ठांच्या मार्गदर्शनावरून

पो नि प्रितम चौधरी यांच्या टिनने ही कठोर कारवाई केली .

. आरोपींनी ही जनावरे कत्तलीसाठी निर्दयतेने व विनापरवाना वाहतूक केली होती. वाहनासह एकूण ₹35 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

  • गुन्हा क्र. 669/2025
  • कायदेभंग : भारतीय न्याय संहिता कलम 325, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5, 5(अ), 5(ब), तसेच प्राण्यांना क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम 1976 चे कलम 11.
  • फिर्यादी : चालक पो.शि. 1784 किरण भगवान राऊत (वय 52, पोलीस ठाणे मालेगाव)
  • संशयीत आरोपी : कंटेनरचा चालक व एक अन्य इसम (नाव-पत्ता अज्ञात).
  • घटना : दि. 08 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11.30 वा., मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल ग्रीनप्लाझा समोर.
  • ताब्यात घेतलेला माल :
    • 53 जनावरे (अनेक जातींची, अंदाजे किंमत ₹31 लाख 20 हजार)
    • टाटा कंटेनर वाहन (किंमत ₹20 लाख)
    • एकूण मालमत्ता अंदाजे ₹35 लाख 20 हजार.

कारवाई :

जनावरे दोरखंडाने घट्ट बांधून निर्दयतेने कत्तल करण्याच्या उद्देशाने बेकायदा वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कंटेनर ताब्यात घेऊन जनावरांची सुटका करण्यात आली. मृत जनावरांचे पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणाचा तपास पो.हवा 1657 फुलमाळी करीत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!