नाशिक ग्रामीण

सरपंचपदी रेखा देविदास जानराव यांची बिनविरोध निवड

सरपंचपदी रेखा देविदास जानराव यांची बिनविरोध निवड

वेगवान मराठी/ एकनाथ भालेराव

येवला :दिनांक :9सप्टेंबर/ येवला तालुक्यातील सायगावच्या सरपंचपदी रेखा देविदास जानराव यांची बिनविरोध निवड झाली आहे.

येवला तालुक्यातील सायगाव ग्रामपंचायत च्या रिक्त सरपंच पदाच्या निवडी प्रसंगी सरपंच पदासाठी रेखा जानराव यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोधपणे सरपंचपदी निवड झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी मंडळ अधिकारी गणेश लाडेकर यांनी काम पाहिले, तर ग्रामविस्तार अधिकारी मुमताज शेख यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.

निवडीनंतर सत्ताधारी सदस्यांच्या हस्ते नूतन सरपंच रेखा जानराव यांचा सत्कार करण्यात आला. या आनंदसोहळ्यात गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून उत्सव साजरा करण्यात आला.

उपसरपंच गणेश माळी, अनिता खैरनार, दिपक खैरनार, डॉ. संदीप पुंड, रंजना पठारे, शालन कुळधर, रुपाली उशीर आणि हे सदस्य उपस्थित होते.

याशिवाय ग्रामस्थांमध्ये आर डी खैरनार, देविदास जानराव, गणपत खैरनार, अशोक कुळधर, विजय खैरनार, साहेब राव कांडेकर, दिनेश खैरनार, काशिनाथ ढाकणे, सुरेश ढाकणे, पपू जानराव, योगेश पठारे, भास्कर देवढे, रामनाथ उशीर, साहेबराव आव्हाड, पंढरीनाथ जानराव, मीना खुरसने, परसनाथ जठार, माणिक आव्हाड गणपत जानराव आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सायगाव ग्रामस्थांनी या निवडीचे स्वागत करत नव्या सरपंचच्या नेतृत्वात ग्रामपंचायतीच्या विकास कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!