साकोरा ता . नांदगांव शिवारात कृषी पंप व साहित्य चोरी
वेगवान मराठी : दि . 20 ऑगस्ट
मारूती जगधने
– नांदगाव तालुक्यातील साकोरा शिवारात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री हल्ला चढवत शेतातील कृषी पंप व त्यासाठी लागणारे साहित्य चोरून नेले. या चोरीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवारातील शेतकऱ्याच्या विहिरीवर लावलेला पंप, पाइप, तारा व अन्य साहित्य चोरट्यांनी उचलून नेले. शेतकऱ्यांनी सकाळी शेतात जाऊन पाहणी केली असता ही घटना उघडकीस आली.
दरम्यान, पावसाळ्याच्या हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पंपाची गरज असताना ही चोरी झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक शेतकऱ्यांत या घटनेमुळे भीतीचे वातावरण असून, रात्रगस्त वाढवावी तसेच शिवारातील चोरीच्या घटनांना आळा घालावा, अशी मागणी होत आहे .
नांदगाव तालुक्यातील साकोरा शिवारातील शिवमळा आदींस विविध भागातून अज्ञात चोरट्यांनी कृषी च्या 30 पंपांची चोरी केली आहे या संदर्भात नागरिकांनी एकत्रितरित्या नांदगाव पोलीस तक्रार दाखल केली आहे . यात लाखोचा फटका शेतकऱ्याना बसला .
चोरी केलेल्या मध्ये विहिरीवर चालू स्थितीत असलेले 30 कृषी पंप त्यासोबत केबल स्टार्टर व कृषी पंपासाठी लागणारी इतर साहित्य चोरट्यांनी मध्यरात्री चोरून नेले मंगळवारी सकाळी शेतकरी आपल्या शेतावर गेल्या नंतर या शेतकऱ्यांना कृषी पंप दिसून न आल्याने व साहित्य चोरी केल्याचे लक्षात आल्यानंतर एकमेकांशी संपर्क करून परिस्थितीची माहिती शेअर केल्यानंतर या संदर्भातली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे या संदर्भात काशिनाथ बोरसे, धर्मावर बोरसे, राजेंद्र बोर से, संजय भामरे ,प्रीतम बोरसे ,दत्तात्रय बोरसे, अण्णा बोरसे, हिम्मत बोरसे ,सर्जेराव बोरसे, विलास बोरसे, रामदास अहिरे, दिलीप बोरसे ,पतंग बोरसे ,अरुण बोरसे ,राजेंद्र भामरे आणि संजय सुरसे इत्यादी शेतकऱ्यांचा तक्रारीत समावेश आहे घटनेची पोलिसांनी नोंद करून घेतली असून तपास सुरू आहे . .



