नाशिक ग्रामीण

नांदगाव /जातेगाव पिनाकेश्वर मंदिर मार्गावर अपघात दोन ठार 11 जखमी

Nandgaon News

जातेगांव ता . नांदगांव येथील पिनाकेश्वर मंदीर रोडवर अपघात 2 ठार ११ जखमी आठ दिवसात दुसरा अपघात

वेगवान मराठी : दि . 18 ऑगस्ट

मारूती जगधने

नांदगाव तालुक्यातील मोठा महादेव पिनाकेश्वर मार्गावर जातेगाव येथील डोंगरावरती भाविकांचा ट्रॅक्टर परतीच्या मार्गावर असताना या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्याने दोघांचा मृत्यू झाला असून 11 जण गंभीर जखमी झाले आहे या घटनेची नांदगाव पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आलेली आहे .

 

गेल्या आठ दिवसांमध्ये याच रस्त्यावरती ट्रॅक्टर पलटी होण्याची दुसरी वेळ आहे .त्यामुळे या रस्त्यावरती संरक्षण भिंत उभारण्याची गरज भासू लागली आहे .

 

जातेगाव येथील पिनाकेश्वर महादेव मंदिराकडे जाणारा रस्ता प्रचंड प्रमाणात चढ आणि उताराचा असल्याने या मार्गावरती सुस्थितीत असलेलीच वाहने या मार्गावर न्यावीम्हणजे भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवणार नाही म्हणजे अपघात टाळता येथील या

रस्त्यावर जाणारी वाहने सुस्थितीत असावी आणि वाहन चालकाने या संदर्भातील संपूर्ण काळजी घ्यावी अशी मागणी भाविकांकडून होत आहे .

 

भविष्यात असे अपघात होणार नाही यासाठी उपाययोजनांची गरज आहे रस्त्याच्या एका बाजूला उताराच्या बाजूने संपूर्णसुरक्षा भिंत उभारण्यात यावी अशी मागणी भाविक करत आहे .

नाशिक ,संभाजीनगर आणि जळगाव या जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेल्या पिनाकेश्वर महादेव मंदिर हे अति प्राचीन मंदिर हे थोर संत जनार्दन स्वामीमौनगिरी महाराज यांचे ते प्रेरणास्थान आहेत त्या मुळे या मंदिराला मोठा महादेव म्हणून संबोधले जाते या मंदिरावरती दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी असते .

 

श्रावण महिन्यात तर संपूर्ण महिनाभर या ठिकाणी रोडग्याचे, दाळ बट्टी ,महाप्रसादाचे आयोजन नागरिक करत असतात त्यामुळे वाहनांची रेलचेल आणि माणसांची गर्दी सातत्याने असते या ठिकाणी संपूर्ण डोंगरावरती सुमारे पाच किलोमीटरचा काँक्रेट रस्ता देखील बनवला आहे त्यामुळे मंदिराच्या अगदी पायथ्यापर्यंत चार चाकी, दुचाकी वाहने आणि सामान वाहून नेणारे मालवाहू टेम्पो किंवा ट्रॅक्टर या रस्त्यावरून मंदिरापर्यंत जाऊ शकतात .

 

या रस्त्यावरती उतार अधिक प्रमाणात असल्याने वाहने कंट्रोलकरणे अवघड होते . त्यामुळे नागरिकांनी वाहनांची परिस्थिती बघून सक्षम वाहनच या मार्गावरती घेऊन जावे जेणेकरून वेळेवर हे वाहन कंट्रोल करता येईल .

दरम्यान

अशा स्वरूपाचा एक अपघात या आठ दिवसांमध्ये दोन वेळा उतारा वरती ट्रॅक्टर घसरून ट्रॉली पलटी झाल्याने नागरिकांना आपला जीव गमावा लागला आहे .

 

तिसऱ्या सोमवारी देखील ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन भाविकांना प्राण गमवावे लागले .

 

दिनांक 17 रोजी पिनाकेश्वर महादेव मंदिरावर दर्शनासाठी आलेले भाविकांचा दर्शन घेऊन परत जात असताना डोंगरावरच ट्रॅक्टरचे ब्रेक फेल होऊन ?नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉली सह दरीत कोसळला ट्रॅक्टर अंदाजे १५० फूट दरीत कोसळला या अपघातात कांताबाई नारायण गायके वय 55 राहणार खामगाव आणि कमलाबाई शामराव जगदाळे वय 60 राहणार जानेफळ जिल्हा छत्रपती संभाजी नगर यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे .मृत्यूमध्ये दोन महिलांचा समावेश आहे .

आणि याच घटनेमध्ये 11 लोक गंभीर जखमी झालेले आहे .या अपघातामध्ये चेतन प्रकाश कवडे ,प्रणिता प्रकाश कवडे, माया प्रकाश कवडे, आप्पा सोपानराव ,श्रावणी आप्पाराव, कल्याणी राजेंद्र कवडे ,साई कवडे ,प्रगती सोमनाथ नवले, आदित्य योगेश कवडे इतारी  भाविक गंभीर जखमी झाले असून या भाविकांना तात्काळ बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वर उपचार देऊन त्यांना पुढील उपचारासाठी त्यांना संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालय घाटी येथे हलविण्यात आले आहे सदर घटना घडता प्रसंगी  प्रत्यक्षदर्शी भावीक आणि पर्यटकांनी परिस्थितीचे गांभीर ओळखून तात्काळ खोल दरीत उतरत सर्व जखमींना बाहेर काढून स्वतःच्या वाहनांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र त पोहच केले .

 

 

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पटाणी करून पोलीस हवालदार भास्कर बसते, पोलीस शिपाई परमेश्वर श्रीखंडे ,होमगार्ड ऋषिकेश पठाडे ,गणेश इप्पर यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन पुढील तपास सुरू केला .

याच श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी विनाकेश्वर येथे या मोठ्या महादेवाच्या मंदिरावरती मोठी यात्रा भरत असते या यात्रे मध्ये सुमारे अडीच लाख लोक सहभागी झाले होते याच यात्रेच्या दरम्यान परतीचा मार्गावर असताना मार्गावर येवला तालुक्यातील उंदीर वाडी येथील भाविकांचा दिंडीतील ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने देविदास दौलत सोनवणे वय 55 यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असून पंढरीनाथ जाधव वय 62 यांना छातीला आणि डोक्याला गंभीर मार लागल्याने ते गंभीर जखमी आहेत राधाकिसन शिरसागर वय 60 साई पवार 16 कृष्ण धामणे 14 यांच्यावर देखील उपचार सुरू आहे हे भाविक देखील गंभीर जखमी झाले आहे यादरम्यान होणाऱ्या अपघातांची मालिका गेल्या आठवड्यामध्ये दोनदा झाली .

 

यावरती उपाय योजना म्हणून किनाकेश्वर महादेव मंदिरावर जाणाऱ्या रस्त्याच्या पूर्वेकडील खोलदरीचा जो भाग आहे त्या भागाच्या बाजूने  रस्त्यावरती कडेला संरक्षण भिंत उभारण्याची अत्यंत गरज आहे यातून अपघात टाळले जाऊ शकतात .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!