नाशिक ग्रामीण

तर.. गणेश मंडळांवर पोलिसांकडून होणार कार्यवाही

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दि.१६ ऑगस्ट २०२५ :- लासलगाव पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गणेशोत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांना सन २०२५ च्या गणेशोत्सवासाठी पोलिसांकडून परवानगी घेणे अनिवार्य असून यासाठी महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
https://citizen.mahapolice.gov.in/Citizen/MH/index.aspx या लिंकवर जाऊन मंडळांनी आपापले ऑनलाईन फॉर्म भरावेत तसेच भरलेला फॉर्म डाउनलोड करून त्याची प्रत लासलगाव पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष जमा करावी असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी केले आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. मात्र सार्वजनिक सुव्यवस्था, सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे प्रत्येक मंडळासाठी बंधनकारक आहे. परवानगी न घेता गणेशोत्सव साजरा करणाऱ्या कोणत्याही मंडळावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.
गणेश मंडळांनी वेळेत ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी शिंदे यांनी केले आहे.

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!