Uncategorizedनाशिक ग्रामीण

या बस मध्ये गर्दी आहे मागून येणाऱ्या बसने या चालक आणि वाहकाचे प्रवाशांना उपदेश

Nandgaon News


बस चालक-वाहकांकडून प्रवाशांना सततचा उपदेश

वेगवान मराठी : दि e ऑगस्ट :- मारुती जगधने

नांदगाव परिसरातील ग्रामीण व शहर बससेवेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अलीकडे लक्षात घेतलेली बाब म्हणजे बस चालक आणि वाहकांकडून होणारा सततचा उपदेश. प्रवासी वृद्ध असो, महिला असो किंवा शालेय विद्यार्थी असो— प्रवासादरम्यान अनेकदा “मागून बस येत आहे, तिच्यात बसा” किंवा “या बसमध्ये गर्दी आहे, दुसरी बस मध्ये या” असे सांगितले जाते.

बिलकुल असाच प्रसंग नांदगाव येथील शालेय विद्यार्थ्यांना शुक्रवारचा दिवस होता सायंकाळी पाच वाजता शाळा सुटते आणि विद्यार्थ्यांना घराची ओढ लागते याच दरम्यान पाच नंतर सुटणाऱ्या बसेस पैकी एक बस नांदगावच्या शनी मंदिर थांब्यावर आलीतेव्हा या ठिकाणी अनेक विद्यार्थी या वेळेला बस शनी मंदिर थांब्यावर थांबली पण बसमधील महिला वाहकाने आतून दरवाजा बंद केला होता साधारण दहा-पंधरा मिनिटं बस उभी होती मात्र दरवाजा उघडलेला नव्हता त्यामुळे विद्यार्थी संतापले आणि ते बच्चा समोर येऊन उभे राहिले आणि त्यांनी पण हट्ट धरला की आम्हाला बसमध्ये यायचं मात्र पंधरा-वीस मिनिटात मागून काय दुसरी बस आलीच नाही यामुळे वाहकाने किंवा चालकाने विद्यार्थ्यांशी केलेली बातचीत म्हणजे मागून बस येत आहे अशी बस मागून आलीच नाही अखेर विद्यार्थी गोंधळ घालवत असताना बसमधील एका प्रवाशांनी दरवाजा आतून उघडला आणि विद्यार्थ्यांसाठी येण्यासाठी जागा दिली प्रवेश दिला आणि मग विद्यार्थी बसून निघून गेले या प्रकाराने पालक वर्ग मध्ये देखील चीड निर्माण झाली आहे विद्यार्थ्यांमध्ये ची देखील चीड निर्माण होईल आणि विद्यार्थी पालक वृद्ध या सर्वांना सातत्याने त्रासच होत राहतं ज्येष्ठांना देखील वाहकांकडून त्रास होत होता एकेरी भाषा वापरली जाते जेष्ठांना बस मध्ये प्रवास करताना पाच धारक असेल ज्येष्ठ नागरिक असेल महिला असेल यांना अपमानाची वागणूक दिली जाते विद्यार्थ्यांना देखील अपमानाची वागणूक दिले जाते त्यामुळे असा प्रकार होऊ नये या संदर्भात वारंवार आगारप्रमुखांना कळविले जाते परंतु त्याच्यात पाहिजे तशी सुधारणा होत नाही तसेच अनेक बस थांब्यांवर बस थांबतच नाही प्रवासी घेते नाही आणि प्रवासी उतरवत पण नाही आणि या वेळेला प्रवाशांनी जर त्यांची बोला चाली केली तर सांगतात कोणी उठावे अन बस थांब मंजूर करून घ्यावे का असे बोल ऐकवल्या जातात प्रवाशांना त्यामुळे प्रवाशांचा प्रवासाचा प्रश्न हा सातत्याने ऐरणीवर येत राहतो .

गर्दीच्या वेळेत, विशेषत: सकाळी व सायंकाळी शाळा-कॉलेजची व कामावर जाण्याची सुटण्याची वेळ असते तेव्हा या घोषणा जास्त प्रमाणात ऐकायला मिळतात. प्रवासी मात्र सांगतात की, अनेकदा पुढची बस वेळेवर न आल्याने किंवा बसमध्ये आधीच जागा कमी असल्याने प्रवासासाठी पर्याय राहत नाही. परिणामी गर्दीच्या बसमध्येच प्रवास करणे भाग पडते.

सार्वजनिक वाहतुकीतील ही परिस्थिती लक्षात घेता, प्रवाशांच्या सोयीसाठी अधिक बसगाड्या सोडाव्यात, तसेच चालक-वाहकांनी प्रवाशांना समजावताना संयम व विनम्रता राखावी, अशी मागणी होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!