अनोखा उपक्रम ; नियमित कर्जदारांचा झाला सन्मान

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : कर्ज घेणे ही एक गरज आहे, परंतु घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड करणे ही एक सामाजिक आणि आर्थिक जबाबदारी आहे. जे कर्जदार ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतात, त्यांचा सन्मान करणे हे संस्थेचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन पी.के. (आप्पा) आहेर ग्रा. बि. शे. सह. पतसंस्थेचे संस्थापक सुनील आहेर यांनी केले.
गुंजाळनगर येथील संस्थेतर्फे आयोजित ‘नियमित व जबाबदार कर्जदार सन्मान सोहळा’ या कार्यक्रम प्रसंगी ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते. याप्रसंगी सहकार अधिकारी ज्ञानेश्वर आहिरे, पतसंस्थेच्या अध्यक्षा डॉ. नूतन आहेर, उपाध्यक्ष किशोर खरोटे, पंचायत समितीचे माजी सभापती अशोक बोरसे, नारायण जाधव, हिरामण गांगुर्डे, भाऊसाहेब मगर, विलास निकम, श्रीराम शिंदे, महेंद्र देवरे, रावसाहेब वाघ, शिवाजी मोरे, आणि बळीराम पवार आदी मान्यवर उपस्थित होते. किशोर खरोटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
यावेळी शेती कर्ज, गृहकर्ज, व्यावसायिक कर्ज यांसारख्या विविध प्रकारच्या कर्जांची वेळेवर परतफेड करणाऱ्या एकूण ५० नियमित कर्जदारांचा सन्मान करण्यात आला. त्यांना भेटवस्तू, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
या सन्मानार्थींमध्ये अनिल पगार, प्रज्ञा पगारे, आप्पासाहेब आहेर, सुधाकर बच्छाव, प्रसाद आहेर, आणि महेंद्र चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. बाळासाहेब पगार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमासाठी संचालक प्रफुल्ल आहेर, दिपक देशमुख, निंबा निकम, सुरेखा मेधने, तुषार आहेर, माजी नगरसेविका श्रीमती वत्सलाबाई आहेर, शीतल बच्छाव, सोनाली पवार, धर्मा चंदन, राहुल बच्छाव, प्रवीण पवार, अनिल सोनवणे, दौलत शेवाळे, योगेश आहीरराव यांच्यासह पतसंस्थेचे सभासद, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



