नाशिक ग्रामीण
येवला तालुक्यात एक जण माश्याच्या जाळ्यात आडकुन मृत्यू

वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव
येवला, ता. 1 आॅगस्ट 2025 तालुक्यामधून एक बातमी समोर आलेली आहे यामध्ये एक व्यक्ती मासेमारी करण्यासाठी नदीत गेला असताना त्यात जाळ्यात अडकून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती ही समोर येत आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कृष्ण लक्ष्मण जाधव वय 41 राहणार बेल्हेगाव हे मासे पकडण्यासाठी नारंगी नदीच्या बांधण्यात गेले असताना मासे पकडण्याच्या नादात ते स्वतः जाळ्यात अडकून पाण्यात बुडून मयत झाले आहे.
आज सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहेत. येवला पोलिसांनी याबाबत नोंद गेली आहे.



