नांदगावजवळ रेल्वे ट्रॅकवर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला; नातेवाईकांचा शोध सुरू
Nandgaon news

नांदगावजवळ रेल्वे ट्रॅकवर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला; नातेवाईकांचा शोध सुरू
वेगवान मराठी 1 September2026
नांदगाव : नांदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाणेवाडी ते हिसवळ रेल्वे ट्रॅकदरम्यान एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून, नांदगाव पोलिसांकडून संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.४२ वाजता पाणेवाडी ते हिसवळ रेल्वे ट्रॅकवरील पोल क्रमांक २७१/१५-१७, नांदगाव हद्दीत हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर सकाळी ९.३५ वाजता पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.
मृत व्यक्तीचे अंदाजे वय ४० ते ४५ वर्षे, उंची सुमारे १५५ सेंमी असून त्याच्या अंगावर निळ्या रंगाचा चट्टेरी/नक्षीदार शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी नांदगाव पोलिसांकडून तपास सुरू आहे.
या वर्णनातील व्यक्ती कोणाच्या परिचयाची असल्यास किंवा तिच्याबाबत काही माहिती असल्यास नांदगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क : नांदगाव पोलीस ठाणे – ०२५५२-२४२३३३.



