नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

क्षितिज” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nandgaon news

क्षितिज” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
वेगवान मराठी :मारुती जगधने
वेगवान मराठी : दि 9 मार्च 20 26
नाशिक : सिद्दीसाई नगाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूल येथे “क्षितिज” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
 शुक्रवार, दि. ६ मार्च २०२६ रोजी उत्साहात करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सुरेश नारायणे व मारुती जगधने (पत्रकार ) उपस्थित होते. तसेच रमेश उग्रसेन बोरसे, घनशाम सुरसे, किरण रमेश बोरसे, ॲड. वंदना पाटील, संचालक केतन आहेर तसेच संस्थेच्या अध्यक्षा सरलाताई निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी विविध नृत्य व नाटकांचे आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. विशेषतः छत्रपती संभाजी महाराज या ऐतिहासिक नाटकाने प्रेक्षकांची दाद मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन . मनोज महाले यांनी केले.हे प्रसंगी सावळा येथील पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!