नाशिक ग्रामीण

आजारी गायींची दारुण अवस्था — उपचाराअभावी मृत्यूची वाट पाहत आहेत

Nandgaon News

आजारी गायींची दारुण अवस्था — उपचाराअभावी मृत्यूची वाट पाहत आहेत

: नांदगाव तालुक्याच्या उत्तर भागातील गोशाळा

वेगवान मराठी : मारुती जगधने 


” दिनांक: 29 ऑक्टोंबर 2025 

नांदगाव तालुक्याच्या उत्तर भागात असलेल्या एका गोशाळेतून समोर आलेली ही दृश्ये अत्यंत वेदनादायक आणि चिंताजनक आहेत.
या गोशाळेमध्ये सुमारे ५० गायी आहेत. रोज सकाळी त्या आजूबाजूच्या जंगलात चारायला जातात, आणि संध्याकाळी पुन्हा गोशाळेत परततात.
मात्र, त्यांच्यातील काही गाई गंभीर आजाराने त्रस्त आहेत — आणि दुर्दैवाने, त्यांच्यावर पुरेसे उपचारच होत नाहीत.

गोशाळेच्या एका कोपऱ्यात काही गाई पडून आहेत. त्यांच्या अंगावर जखमा, काहींना अंगावर किडे, काही अशक्त आणि भुकेल्या अवस्थेत आहेत.
ज्या गायी आजारी पडतात, त्यांच्यावर औषधोपचार न केल्याने त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे.
शेवटी त्या गोशाळेच्या परिसरातच मरण पावतात आणि नंतर त्यांना तिथेच दफन केलं जातं.

या सर्व परिस्थितीत सर्वाधिक चर्चेत असलेली घटना म्हणजे एक काळ्या रंगाची गाय —
ती गंभीर जखमी आहे. तिच्या धोपराजवळ (जांघेच्या भागात) मोठी जखम झाली आहे आणि त्या जखमेवर किडे पडले आहेत.
योग्य उपचार न मिळाल्याने ती गाय आता मरणासन्न अवस्थेत आहे.

 — हीच ती गाय जी गेल्या काही दिवसांपासून इथे पडलेली आहे.
तिच्या जखमेवर कोणतंही मलम लावलेलं नाही. ती श्वास घेत आहे, पण अत्यंत वेदनादायक अवस्थेत.
आणि सर्वात भीषण म्हणजे — तिच्या जवळच जमिनीत एक खड्डा खोदलेला आहे.
सामाजिक कार्यकर्ते सांगतात , ती गाय मेल्यानंतर इथेच तिला दफन करण्यात येणार आहे.”

या दृश्यांनी प्रश्न निर्माण केला आहे —
गोशाळा म्हणजे प्राण्यांना संरक्षण देण्याची जागा की त्यांच्या मृत्यूची वाट पाहण्याचं ठिकाण?
प्रशासन आणि पशुसंवर्धन विभागाने तात्काळ दखल घेऊन या गायींना योग्य उपचार मिळावेत, अशी गावकऱ्यांकडून मागणी होत आहे.

प्राणी हेही सजीव आहेत — त्यांचं दुःख, त्यांची वेदना आपल्यापर्यंत पोचायला हवी.
नाहीतर अशी दृश्यं आपल्याला माणूस म्हणून लाजवतील.

  • “गोशाळेतील गायींची दारुण अवस्था — प्रशासन कधी जागं होणार?”
  • ही मरणासन्न अवस्थेतील काळी कपिला गाय आणि तिच्यासमोर तिच्या मृत्यूनंतर दफन करण्यासाठी खोदून ठेवलेला तो एक खड्डा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!