लोकल बातम्या

सिन्नर तालुक्यात विविध ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोर

सिन्नर , दि ; 20 फेब्रुवारी 2026 —

प्रहार जनशक्ती पक्षामार्फत शिवजयंती उत्साहात साजरी…

प्रहार जनशक्ती पक्षामार्फत सिन्नर येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळेस महिलांचा उत्कृष्ट प्रतिसाद होता .

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाचं पूर्ण महाराष्ट्र दुःखात सावट असल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्ष सुद्धा दुःखात सहभागी आहे. आमदार बच्चू कडू सुद्धा दुःखात सहभागी आहे. सिन्नर तालुका सुद्धा दुःखात सहभागी आहे .म्हणून साध्या शिवजयंती साजरी करण्यात आली आहे . प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुकाध्यक्ष महिला पुष्पाताई भोसले .तालुका कार्याध्यक्ष आशाताई गोसावी .महिला शहराध्यक्ष संगीता आगळे. शिवजयंतीचा यांनी आयोजन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला .शेकडो नागरिक महिला हजर होत्या. प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष छत्रपती ग्रुप चे जिल्हाध्यक्ष कैलास दातीर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यात आली .यावेळेस शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत डावरे .युवा अध्यक्ष पांडुरंग आगळे .शहराध्यक्ष गणेश थोरात .तालुका संघटक शेतकरी प्रहार भास्कर दराडे .उपाध्यक्ष प्रकाश थोरात .पवार साहेब सामाजिक कार्यकर्ते सांगळे .आधी सह कार्यकर्ते उपस्थित होते.

दापुर; राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) शिवाजी महाराज यांना अभिवादन….

दापुर येथे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती साजरी करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगेश आव्हाड, मा.चेअरमन प्रभाकर दराडे, उद्योजक दत्तु पोपट आव्हाड यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी मा.सरपंच सोमनाथ आव्हाड, शिवाजी दराडे,मोहनशेठ काकड, श्रीरामशेठ आव्हाड,कचुनाना आव्हाड, पोलिस पाटील ज्ञानेश्वर साबळे,दत्तु आव्हाड अशोक आव्हाड, आव्हाड बाबा,रमेश आव्हाड,भिवाजी गारे, विशाल आव्हाड,सोमनाथ विंचुरे,समाधान आव्हाड भाजीपाला व्यापारी, निवृत्ती उगले, बाळासाहेब भालेराव, भास्कर आव्हाड,
भाऊसाहेब कांदे,पोपट आव्हाड, मारुती आव्हाड, अंबादास आव्हाड, संदिप आव्हाड, अशोक शिंदे, रमेश आव्हाड,निवृत्ती बेदाडे, शब्बीर सैय्यद, पंकज शिंदे,गणेश मचकुले, साहिल सैय्यद.योगेश पवार,दशरथ आव्हाड आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगेश आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे आयोजन केले.
तसेच दापुर येथील साहिल मचकुले यांच्या नविन जय मल्हार साऊंड सिस्टीमचे उद्घाटन करण्यात आले.

शहा ; पाचवी च्या वेदिका जाधवचा तालुक्यात गवगवा…

पाचवीच्या वेदिका जाधवने शिवमय वातावरणात  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सुरेल आवाजात गाणी गायली आणि उपस्थित शिवभक्तांना मंत्रमुग्ध केले…

पाचवी च्या विद्यार्थीनींनी शिवचरित्रावर गायनाचा तालुक्यात गवगवा…
सिन्नर तालुक्यातील शहा येथील श्री.कालभैवनाथ माध्यमिक विद्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. या पावन मुहूर्तावर एक सुर्य चमकला आशा तमाम मराठी जनांच्या दैवताला वंदन करून आपल्या मंजुळ आवाजात शिव महिमा गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले..
याच विद्यालयात शिक्षण घेत असताना इयत्ता पाचवी त शिकणारी वेदिका दत्तात्रय जाधव हिला गायणाची प्रचंड अवड असुन घरातील शिवमय वातावरण व संस्कार आणि शाळेतील शिक्षक याचे मार्गदर्शन लाभलेल्या वेदिका हिला एवढ्या लहान वयात मोठे स्वप्न पहायला मिळणार… कु. वेदिका हिचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे…

 

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!