नाशिक ग्रामीण
सिन्नर : सोनवणे वस्तीवर कोंबड्यांच्या शेडवर बिबट्याचा धुमाकूळ… शेकडो कोंबड्यांचा फडशा — लाखाचे नुकसान… !

मोठी बातमी : वेगवान मराठी / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर ‘ दि ; 26 डिसेंबर 2025 — सिन्नर तालुक्यातील मानेगाव येथील सुखदेव गणपत सोनवणे यांच्या कोंबड्यांच्या शेडमध्ये बिबट्याने रात्री दोन वाजता अचानक हल्ला केल्याने जवळपास 200 कोंबड्यांचा बळी घेतला आहे. श्री सोनवणे यांनी शेती व्यवसाय बरोबरच जोडधंदा म्हणून कोंबड्यांचा व्यवसाय निवडला आहे .त्यासाठी त्यांनी कोंबड्यांना लोखंडी जाळीच्या तार कंपाऊंडने शेड तयार केली व त्यामध्ये जवळपास 200 कोंबड्या पाळल्या होत्या.. शेतीबरोबरच कसा बसा कोंबड्यांच्या उत्पन्नावर आपला उदारनिर्ह भागवत असलेल्या सोनवणे कुटुंबियांवर बिबट्याने अचानक हल्ला केल्ल्याने दोनशे कोंबड्यांचा बळी जाऊन जवळपास दीड ते दोन लाखाचे नुकसान झाले आहे.
सदर घटना 25 डिसेंबर रोजी रात्री दीड ते दोनच्या दरम्यान घडली भक्काष्याच्या शोधात असलेल्या बिबट्या ने काटेरी झुडपातून व उभ्या असलेल्या पिकातून दबा धरला थेट कोंबड्यांच्या आवाजाच्या दिशेने आपला मोर्चा वाळवला कोंबड्यांचा आवाज वाढत चालला आणि बिबट्यांचा मागवा घेण्याचा मार्ग मोकळा झाल्याने बिबट्या थेट कोंबड्यांच्या शेड जवळ येऊन जमिनीखाली माती कोरुन कोरून जाळी उचकटून आत शिरला व एकेक कोंबडी खाण्याचा सपाटा लावला .कोंबडी खाताना फक्त कोंबडीचा रक्त प्यायचा आणि दुसरी कोंबडीवर पुन्हा तवा हाणायचा असं करत त्यांने जवळपास 200 कोंबड्यांचा एका दमात फरशा पडला.. बिबट्याने सर्वच भागात दहशत माजवली असून हिंम्मत वाढलेल्या बिबट्याने अनेक शेतकऱ्यांची व लहान मुलांचा बळी घेतला आहे व पाळीव प्राण्यांची शिकार आणि पाळीव पशु पक्षांची मोठ्या प्रमाणावर बळी गेला आहे .याला जबाबदार कोण असा प्रश्न सर्वसामान्य जनता करत आहे.. सोनवणे वस्तीवरील सदर घटनेचा गावकऱ्यांनी पंचनामा करून संबंधित खात्याला कळवले असून अद्याप पर्यंत कुठलीही कार्यवाही झाली नाही व पिंजराही बसवण्यात आलं नसत्याची सोनवणे यांच्या कडून सांगण्यात आले आहे.. कार्यवाही होईल अशी अपेक्षा व्यक्त करून सोनवणे यांनी दिरंगाई का असा प्रश्न विचारला आहे … त्वरित शासनाकडून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी व परिसरात पिंजरा बसवण्यात यावा अशी मागणी ही सोनवणे यांनी केली आहे.
बिबट्याची हिंमत वाढली .. …
बिबट्याच्या हल्ल्यात शेकडो कोंबड्यांचा फडशा … ! दोन लाखांचे नुकसान — दहशत कायम…




