ढोल ताशे वाजवत मोरया प्रतिष्ठान व शेतकऱ्यांच्या वतीने मोफत कांदा वाटप; या तालुक्यातील घटना
केंद्र व राज्य शासनाच्या निषेध ; या तालुक्यातील घटना

- ढोल ताशे वाजवत मोरया प्रतिष्ठान व शेतकऱ्यांच्या वतीने मोफत कांदा वाटप; या तालुक्यातील घटना
वेगवान न्यूज नेटवर्क/ मनोज वैद्य
सतत होत असलेल्या भावातील घसरणीमुळे केंद्र व राज्य शासनाच्या निषेधार्थ देवळा येथे ढोल वाजवून मोरया प्रतिष्ठान व शेतकऱ्यांच्या वतीने मोफत कांदा वाटपाचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

नाशिक जिल्ह्यात सर्वत्र नगदी पिक म्हणून मोठ्या प्रमाणात कांदा पिकवला जातो. शेतकऱ्यांना शास्वत पिक म्हणून कांदा पिकावर अवलंबून राहवे लागते. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकाच्या निर्याती बाबतच्या धरसोडीमुळे कांद्याचे भाव गडगडले. त्यामुळे हातात आलेला कांदा मातीमोल भावात शेतकऱ्यांना विकावा लागत असून त्यामुळे झालेला उत्पादन खर्च देखिल वसूल होत नाही. त्यामुळे देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी व केंद्र व राज्य शासनाचा निषेध म्हणून शेतकरी बांव व मोरया प्रतिष्ठान देवळा यांनी सयुक्तीकरित्या देवळा पाचकंदिल चौकात कांद्याचे ट्रक्टर आणून ये – जा करणाऱ्या नागरिकांना गोणी भरून मोफत कांद्याचे वाटप केल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला. यावेळी मोरया प्रतिष्ठानचे उमेश आहेर, चेतन आहेर, भूषण आहेर, विकी ठुबे, उज्वल भामरे, शुभम शुभम देवरे, संदेश निकम,ब काकाजी शेवाळे, दर्शन देवरे, संकेत आहेर, रोशन मोरे, यश आहेर, शुभम देवरे, विलास शिंदे. मयूर बागुल. भूषण कापडणीस. अमोल निकम, मयूर मते, पवन देवरे, निलेश निकम, मंगेश जाधव, अविनाश देवरे, विशाल टरले, रितेश डांगरे, विलास देवरे, विलास शिंदे, संदीप मेधने, निखिल चव्हाण आदी उपस्थित होते.



