सिन्नर ; MIDC मध्ये पुन्हा भीषण आगीचे तांडव —
वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोर
सिन्नर , दि : सिन्नर ते माळेगाव एमआयडीसीत अग्नी तांडव … दररोज एका कंपनीला लागण्याच्या घटना सुरूच
: सिन्नर एमआयडीसीत आज दुपारी कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. नुकतीच माळेगाव एमआयडीसीतील धनश्री पेपर रोल कंपनीला आग लागली होती, ज्यात लाखोंचा कच्चामाल खाक झाला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले .
मागील वर्षी मुसळगाव एमआयडीसीतही अशीच आदिमा ऑर्गनिक्स कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली होती .
या घटना ताज्या असतानाच आज दुपारी पुन्हा माळेगाव एमआयडीसीच्या हद्दीतील मोहदरी घाटाच्या वन विभागाजवळील कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.. आगीने रौद्ररूप धारण केले होते . सुदैवाने कुठे जीवित हानी झाली नाही .अशी प्राथमिक माहिती आह.
आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली असल्याचे दिसत आहे. सदैवाने कुठेही जीवितहानी नाही
- तीन दिवसांपूर्वी मुसळगाव एमआयडीसी मध्ये व्हीनस पॅकेजिंग या कंपनीच्या गोडाऊनला आग लागली होती. त्यामध्येही पेपर रोल होते.वेळीच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्याने आग विझवण्यत यश आले .
-

Oplus_131072 या घटना ताज्या असतानाच व ती आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले नाहीत तर तोच आज दुपारी पुन्हा माळेगाव एमआयडीसीच्या हद्दीतील मोहदरी घाटाच्या वन विभागाजवळील कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे .



