मा. कृषि मंत्री – माणिकराव कोकाटे यांना पितृशोक — शिवाजी ( आप्पा ) कोकाटे यांनी 93 व्या वर्षी घेतला अखेर चा श्वास … !
Honorable Agriculture Minister Manikrao Kokate suffers a personal loss --- Shivaji (Appa) Kokate passed away at the age of 93...!

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
माजी कृषिमंत्री, आमदार माणिकराव कोकाटे यांना पितृ शोक.., शिवाजी आप्पा कोकाटे याचे वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेर चा श्वास.,
सिन्नर, दि ; 4 फेब्रुवारी 2026 —
सिन्नर विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा. श्री. माणिकरावजी कोकाटे यांचे वडील
स्व. शिवाजीराव मुरलीधर कोकाटे (आप्पा) (वय ९३ वर्षे)
यांचे आज वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले.
एक प्रेमळ व्यक्तिमत्व आणि समाजकार्याचा मोठा वारसा देणारे वडीलधारे नेतृत्व आपल्यातून हरपले आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि कोकाटे परिवाराला या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती देवो,हीच प्रार्थना. सोमठाणे. सांगवी येथील ग्रामस्थांनी केली.
अंतिम संस्कार विधी:
स्थळ: रयत शिक्षण संस्था मैदान,सोमठाणे (ता. सिन्नर) होणार आहे.
वेळ: आज दिनांक ४ फेब्रुवारी सकाळी ११:०० वाजता होणार असल्याची माहिती कुटुंबाकडून देण्यात आली आहे.
माणिकराव कोकाटे यांना पितृ शोक झाल्याची माहिती मिळालेली आहे .
माणिकराव कोकाटे हे महाराष्ट्राचे माजी कृषिमंत्री आणि सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे विधायक आहेत. त्यांना 1995 सालच्या सदनिका घोटाळाप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे .
माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय कारकिर्दीत ते पाचव्यांदा विधायक म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांतून काम केले आहे ⁴. सध्या ते अजित पवार गटाचे आमदार आहे.
माणिकराव कोकाटे यांना पितृ शोक झाल्याची माहिती मिळालेली आहे. माणिकराव कोकाटे हे महाराष्ट्राचे माजी कृषिमंत्री आणि सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे विधायक आहेत. त्यांना 1995 सालच्या सदनिका घोटाळाप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
शिवाजी आप्पा हे शेतकरी कुटुंबातील सोमठाणे गावचे रहिवासी आहे.. संघर्षात आयुष्य ची वाटचाल सुरू केली. त्यांचा मनमिळाऊ स्वभावाने शांत आणि संयमी व ग्रामीण संस्कृती जपत त्यांनी खेडोपाड्यात एक वेगळा ठसा उमटवला होता.. आज त्यांच्या जाण्याने कोकाटे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.. शोकाकुल वातावरणात त्यांना आज अखेरचा निरोप देण्यात येणार आहे..



