संघात मका,सोयाबीनची हमीभावाने खरेदी सुरू करावी! येवला तालुका खरेदी-विक्री संघाच्या सर्वसाधारण सभेत केला ठराव
संघात मका,सोयाबीनची हमीभावाने खरेदी सुरू करावी! येवला तालुका खरेदी-विक्री संघाच्या सर्वसाधारण सभेत केला ठराव

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव
येवला,ता. 25सप्टेंबर/ यावर्षी खरिपाची पिके चांगली आली असून शेतकऱ्यांना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमीभावाचा लाभ मिळावा यासाठी येवला तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून ,पणन महासंघ मुंबई मार्फत हमीभावाने खरेदी सुरू करावी अशी मागणी सर्वसाधारण सभेत करण्यात आली.यासंदर्भात ठराव करून सर्वानुमते पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शेतकरी संस्था असलेल्या येवला तालुका खरेदी विक्री संघाची सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहात संघाचे अध्यक्ष सुनील देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी ज्येष्ठ संचालक पि. के. काळे यांनी संघाच्या कामकाजाची माहिती देऊन शेतकरी हितासाठी संघ कटिबद्ध असल्याचे सांगितले. चेअरमन श्री. सुनील देशमुख यांनी अहवाल वाचन करून संघाच्या परिस्थितीची माहिती दिली.व्हा .चेअरमन सौ. सविता दत्तू देवरे यांनी संघाने शेतकरी हितासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने मका व सोयाबीनचे पिक जोमात असून उत्पन्न चांगले निघणार आहे.सध्या खाजगी बाजारात या दोन्ही पिकांना असलेला भाव पाहता शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळणे गरजेचे आहे,त्यासाठी महाराष्ट्र राज्य पणन महासंघ मार्फत दरवर्षीप्रमाणे खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून मका, बाजरी ज्वारी व सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यात यावी अशी मागणी सभासदानी केली तसेच यासंदर्भात लोकप्रतिनिधीसह संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर खरेदीसाठी नावनोंदणी सुरू करण्याची मागणी करण्याचे ठरले.
संघाचे व्यवस्थापक बाबासाहेब जाधव यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.यावेळी उपाध्यक्ष सौ सविता दत्तू देवरे संचालक परसराम गांगुर्डे,संचालक भास्कर येवले,मनोज रंधे,प्रताप दाभाडे,संजय सालमुठे ,विजय कोटमे,मच्छिंद्र थोरात, ज्ञानेश्वर बोरणारे,ऋषिकेश कुऱ्हे,सुमित थोरात,दत्तू देवरे,दिलीप बोडके,प्रताप दाभाडे,नंदकिशोर भोरकडे,संतोष खकाळे,भाऊसाहेब सोनवणे,दत्तू जाधव,अनिल कापसे आदींचा सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.
फोटो
येवला : तालुका खरेदी-विक्री संघाच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित संचालक मंडळ व सभासद.



