जिल्हा परिषद मुलींची शाळा बनली फुलांची शाळा… रम्य परिसर,जर्मनी आणि जपानी भाषा, आनंद दायी शिक्षण
जिल्हा परिषद मुलींची शाळा बनली फुलांची शाळा... रम्य परिसर,जर्मनी आणि जपानी भाषा, आनंद दायी शिक्षण

वेगवान मराठी/ एकनाथ भालेराव
येवला:- दिनांक 16 ऑक्टोबर 2025
शिक्षक व गावाकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून मुलींची शाळा इतकी बदलली की महागड्या इंग्रजी शाळा सोडून पावले आता या जिल्हा परिषद शाळेकडे वळू लागली आहेत.फुला फुलांचा बगीचा, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, सजावट, बोलक्या भिंती आणि जपानी आणि जर्मन भाषेतून संवाद करू शकणाऱ्या चिमुरड्या…
ही शाळा आहे येवला तालुक्यातील अंदरसूल गावची…
शिक्षकांनी व ग्रामस्थांनी मिळून वर्गणी गोळा करून रंगरंगोटी केली अभ्यासिका, कॉम्प्युटर लॅब, सोबत टॅबलेट, अशा आधुनिक सुविधा उभारल्या आणि पट संख्या वाढू लागली..आणि २८२ विद्यार्थिनींसह ‘हाऊसफुल्ल’ झाली…
याचे सर्व श्रेय जाते ते किशोरी नोकोड,विलास जानराव,आशा वर्पे,
,मुक्तानंद सोमासे, जयश्री पालवे मनीषा कंठाळे,सुमित्रा दातीर, रत्ना थोरात,पंडित गरुड, प्रदीप आहिरे
संदीप कांडेकर या शिक्षकांना
विद्यार्थिनींनी खो-खो, कबड्डीसारख्या खेळांमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये मेडल मिळवून शाळेचा गौरव वाढविला आहे.
#########
सुविधा आणि हसत खेळत शिक्षण, अनोखे उपक्रम, भौतिक सुविधा आणि शिक्षक यामुळे विद्यार्थीनींना दर्जेदार शिक्षण मिळत आहे.
— अमोल सोनवणे, उपसरपंच, ग्रामपंचायत अंदरसूल
########
विद्यार्थ्यांना बहूअंगी आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सर्व शिक्षक खुप मेहनत घेतात, गावकरी पण योगदान देतात.
— बाबासाहेब बेरगळ, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद मुलींची शाळा, अंदरसूल



