दोन वेळेस जेरबंद करुनही तिसऱ्यांदा बिबट्याचा या भागात मुक्त संचार … पशुपक्षांवर हाल्ले सुरुच — !
वेगवान मराठी / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर , दि : 19 जानेवारी 2026 — वेळापूर येथे बिबट्याचा पुन्हा मुक्तस संचार
कोपरगाव तालुक्यातील वेळापूर येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. दिनांक 12 जानेवारी रोजी एक बिबट्या जेर बंद केल्यानंतर पुन्हा एकदा बिबट्याचा वावर सुरूच असून काही दिवसांपूर्वी दोन वेळा बिबट्या जेरबंद करुनही तिसऱ्यांदा बिबट्या चा कुत्र्यावर जिवघेणा हल्ला केल्याने या भागात पुन्हा एकदा बिबट्या ने दहशत निर्माण केली आहे.

वेळापूर शिवारामध्ये पगार वस्ती येथे रात्री बिबट्याचा वावर दिसून आला आहे . रविवार संध्याकाळी आठ वाजता निवृत्ती बळवंत पगार यांच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला चढवला व गाईंच्या गोठ्यात जाण्याचा प्रयत्न केला .कुत्र्याचा आवाज ऐकल्यानंतर वस्तीवरील लोक धावले आणि त्यांनी मोठ्याने ओरड ओरड केल्यामुळे बिबट्याच्या तोंडातून कुत्र्याची सुटका केली व बिबट्या शेजारच्या उसाच्या शेतामध्ये पळाला असून शेतकऱ्यांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .तरी वनाधिकाऱ्यांनी दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी शेतकऱ्यांच्या वतीने मागणी होत आहे. या भागात दहशत निर्माण करणार्या बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात असुन या परिसरात कायम स्वरुपात जागोजागी पिंजरा बसवण्यात यावेत अशी मागणी येथील परीसराततील गावकऱ्यांनी केली आहे…



