नाशिक ग्रामीण

निफाड पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दि.१३ ऑक्टो २०२५ :- निफाड पंचायत समिती सभापती पद यापूर्वीच अनु.जमाती महिलेसाठी राखीव झाले आहे. आज दि.१३ ऑक्टो रोजी निफाड प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांचे अध्यक्षतेखाली व तहसिलदार विशाल नाईकवाडे, नायब तहसिलदार राहुल मुळीक यांचे उपस्थितीत निफाड पंचायत समिती गणांचे आरक्षण काढण्यात आले. आरक्षित जागांचे आरक्षण लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने तर जनरल जागेचे आरक्षण राजविर येवले या चार वर्षीय बालकाच्या हातून चिट्ठी पद्दतीने काढण्यात आले.
एकूण १६ गणांपैकी लासलगाव गणात अनु.जाती प्रवर्गातील सर्वाधिक ३५६९ मतदार असल्याने लासलगाव हा गण अनु जाती (महिला) प्रवर्गासाठी जाहीर झाला आहे.
कोकणगाव गणात ८१४७, कोठूरे गणात ६८५६ तर कसबे सुकेणे गणात ६८२९ मतदार अनु.जमाती प्रवर्गातील असल्याने हे तिन्ही गण या प्रवर्गासाठी निश्चित झाले आहेत. चिट्ठी पद्दतीने कोकणगाव व कसबेसुकेणे गण याच प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. तर इतर प्रवर्गातील चिट्ठी पद्दतीने नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी करंजगाव (महिला), विंचुर (महिला), पिंपळस, चांदोरी तर सर्वसाधारण जागेसाठी पालखेड, नांदुर्डी (महिला), टाकळी विंचुर, डोंगरगाव, उगाव (महिला), सायखेडा, नांदूरमध्यमेश्वर, देवगाव (महिला) असे निश्चित झाले आहे. याबाबत दि.१४ ते दि.१७ पर्यंत सूचना व हरकतीसाठी वेळ देण्यात आला असल्याची माहिती प्रांत शशिकांत मंगरुळे यांनी दिली.

 

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!