नाशिक ग्रामीण

भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण;, पाहा नाशिकच्या बाजारातील आजचे ताजे भाव

Vegetable prices have dropped significantly; see today's latest prices in the Nashik market.

वेगवान नाशिक  / साहेबराव ठाकरे

नाशिक, मनमाड,ता. 8 जानेवारी 2026 –

नाशिक/मनमाड: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कडाडलेल्या भाजीपाल्याच्या किमतीत आता मोठी घसरण झाली असून, यामुळे कोलमडलेले गृहिणींचे बजेट पुन्हा सावरण्यास मदत झाली आहे.

राज्यभरात झालेला मुबलक पाऊस आणि सध्याचे पोषक हवामान यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. याचा थेट परिणाम बाजारपेठेतील आवक वाढण्यावर झाला असून दरात लक्षणीय घट पाहायला मिळत आहे.

नाशिक-मनमाड बाजारातील आजचे भाव (प्रति किलो):

बाजारात सध्या कोणत्या पालेभाज्या आणि फळभाज्या किती रुपयांना मिळत आहेत, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:

  • कांदा: २० रुपये किलो

  • आले (Ginger): ८० रुपये किलो

  • टोमॅटो: ६० रुपयांवरून घसरून ४० रुपये किलो

  • कोथिंबीर: १० रुपये जुडी

  • मेथी, पालक, शेपू, कांदापात: प्रत्येकी १० रुपये जुडी

  • काकडी: ३० रुपये किलो

  • बीट: ६० रुपये किलो

  • गाजर: ६० रुपयांवरून ४० रुपये किलो

  • कोबी व फ्लॉवर: २० रुपये गड्डा

  • सिमला मिरची: ६० रुपये किलो

  • दुधी भोपळा: १० रुपये नग

  • मटार: ३० ते ४० रुपये किलो (पूर्वी ६० ते ८० रुपये होते)

  • वांगी: ३० ते ४० रुपये किलो (पूर्वी ९० ते १०० रुपये होते)

लसूण अजूनही तेजीत!

इतर सर्व भाज्या स्वस्त झाल्या असताना लसणाने मात्र अजूनही आपला दर टिकवून ठेवला आहे. सध्या लसूण १२० रुपये किलो दराने विकला जात आहे, जो सामान्यांच्या खिशाला थोडा जड जात आहे. तसेच गवार शेंग अद्याप १५० ते २०० रुपये किलोवर कायम आहे.

पुढील दोन महिने दर स्थिर राहण्याची शक्यता

भाजी विक्रेत्यांच्या मते, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेली ही दरवाढ आता कमी झाली असून पुढील एक-दोन महिने दर असेच स्थिर राहण्याची चिन्हे आहेत. मात्र, उन्हाळा सुरू होताच पुन्हा भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

वेगवान डिजीटल टीम

वेगवान डिजीटल टीम ही वेगवान कार्यालयातील उपसंपादक लोक हे वेगवान नाशिकच्या अधिकृत पॅनलवरुन बातमी चालवत असतात. सदर बातमी ही वेगवान मधील प्रमुख लोक चालवत असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!