
ऐतिहासिक सोहळा
वेगवान मराठी : मारुती जगधने
दि २९ डिसेंबर २० २५
नांदगांव :
नांदगाव नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा उत्सहान संपन्न झाला .
नांदगाव नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचा भव्य पदग्रहण सोहळा नांदगाव शहरातील शिवस्फूर्तीच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्यास आमदार सुहास कांदे तसेच सौ. अंजुमताई कांदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
नगरपरिषद निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवलेल्या नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी यावेळी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. पदग्रहण प्रसंगी नवनिर्वाचित नगराध्यक्ष सागर हिरे यांनी “जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत नांदगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रामाणिकपणे काम करू” अशी शपथ घेतली. ऐतिहासिक सोहळा
अतिशय उत्साहात नांदगाव नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा संपन्न झालां
नांदगाव नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचा भव्य पदग्रहण सोहळा नांदगाव शहरातील शिवस्फूर्तीच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्यास आमदार सुहास अण्णा कांदे तसेच सौ. अंजुमताई कांदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
नगरपरिषद निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवलेल्या नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी यावेळी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. पदग्रहण प्रसंगी नवनिर्वाचित नगराध्यक्ष सागर हिरे यांनी “जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत नांदगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रामाणिकपणे काम करू” अशी शपथ घेतली. याचप्रमाणे सर्व नगरसेवकांनीही नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध राहण्याची शपथ जनतेसमोर घेतली.
नांदगाव शहराच्या राजकीय इतिहासात प्रथमच २१–० असा निर्विवाद कौल मिळवत नगरपरिषदेवर सत्ता स्थापन होणे ही अभूतपूर्व घटना ठरली आहे. हा विजय आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भरीव विकासकामांवर जनतेने व्यक्त केलेल्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
सोहळ्यादरम्यान कार्यकर्ते, नागरिक व समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी, घोषणा आणि अभिनंदनपर भाषणांमुळे संपूर्ण परिसर उत्साहाने भारावून गेला होता. नांदगाव शहराच्या विकासाला नवी दिशा देणारा हा पदग्रहण सोहळा निश्चितच ऐतिहासिक ठरला आहे. सर्व नगरसेवकांनीही नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध राहण्याची शपथ जनतेसमोर घेतली.
नांदगाव शहराच्या राजकीय इतिहासात प्रथमच २१–० असा निर्विवाद कौल मिळवत नगरपरिषदेवर सत्ता स्थापन होणे ही अभूतपूर्व घटना ठरली आहे. हा विजय आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भरीव विकासकामांवर जनतेने व्यक्त केलेल्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
सोहळ्यादरम्यान कार्यकर्ते, नागरिक व समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी, घोषणा आणि अभिनंदनपर भाषणांमुळे संपूर्ण परिसर उत्साहाने भारावून गेला होता. नांदगाव शहराच्या विकासाला नवी दिशा देणारा हा पदग्रहण सोहळा निश्चितच ऐतिहासिक ठरला आहे.



