महाराष्ट्र,देश

फिरत्या वाचनालयाची दोन दशकांची यशस्वी वाटचाल ; पिठाची गिरणी अण वाचनाची भूक…

फिरत्या वाचनालयाची दोन दशकांची यशस्वी वाटचाल ; पिठाची गिरणी अण वाचनाची भूक...

वेगवान मराठी/ एकनाथ भालेराव

येवला: दिनांक :14 ऑक्टोबर/ शालेय जीवनापासुन अनेक पुस्तक वाचल्यानंतर त्याचे विचार बदलले आणि वाचनाचा संस्कार समाजात रुजवण्याची मनाशी खूणगाठ बांधली…
स्वतःचा पीठ गिरणीचा व्यवसाय सांभाळत त्याने सायकल वरून फिरते वाचनालय सुरु केले…स्वखर्चाने हजारो रुपये खर्च करून पुस्तके विकत घेतली आणि दारोदारी वाचाययला दिली..

आज या फिरत्या वाचनालयाला २१ वर्षे (दोन दशके) पूर्ण होत आहेत.
सुरुवातीला काहीशा अल्प पुस्तकांपासून सुरू झालेल्या या उपक्रमात आज ३,००० पेक्षा अधिक दर्जेदार पुस्तकांचा खजिना वाचकांसाठी खुला आहे.

इतरांच्या वाचनाची भूक भागवण्यासाठी स्वतःच्या मेहनतीचा पैसा खर्च करणारे विरळच.
अंदरसूल येथील संतोष पुंड यांनी दोन दशकांपूर्वी एक अनोखा प्रवास सुरू केला — फिरते वाचनालय.

” पीठ गिरणीचा व्यवसाय सांभाळून पुस्तक हेच माझे जीवन बनले आहे.
या वाचनालयामुळे नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी,
मुलांना वाचनाची ओढ लागली तर देश नक्कीच महासत्ता बनेल.”
— संतोष पुंड, अंदरसूल

घरपोच वाचन सेवा — सायकलवरून ज्ञानप्रसार

या वाचनालयाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची घरपोच सेवा.
वाचकांनी पुस्तकाचे नाव सांगितले की, संतोष पुंड सायकलवरून थेट घरपोच पुस्तक देतात.
कोणतेही सदस्यत्व शुल्क नाही, कोणतीही फी नाही — फक्त ज्ञानाची सेवा!

त्यांच्या वाचनालयात राजश्री शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांच्यावरील पुस्तके तसेच मुलांसाठी गोष्टींची पुस्तके, सामाजिक आणि प्रेरणादायी ग्रंथ मुबलक प्रमाणात आहेत.

महिला, विद्यार्थी आणि समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

फिरत्या वाचनालयामुळे अंदरसूल परिसरात महिला आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढली आहे.
संतोष पुंड यांच्या मते, “मुलांमध्ये वाचनाची सवय लागली तर विचार बदलतात आणि संस्कार घट्ट रुजतात.”

ते केवळ वाचनच नव्हे, तर सामाजिक स्नेहाचे कार्यक्रमही घेतात, महिला दिनानिमित्त गुणी महिलांचा सत्कार करणे, डॉक्टर डे निमित्त सर्व डॉक्टरांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान करणे, शिक्षक दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करणे
आणि या सर्व कार्यक्रमांसाठी स्वतःचा खर्च हा वसा संतोष पुंड यांनी जपला आहे.

स्वतः कष्ट करून, स्वतःचा वेळ आणि पैसा समाजासाठी खर्च करणारा हा तरुण आज वाचनसंस्कृतीचा दीपस्तंभ ठरला आहे.त्यांच्या या कार्याने येवला तालुक्याच्या ज्ञानविश्वात नवी जागृती निर्माण केली आहे.

***********
“माननीय मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून लवकरच स्थायी वाचनालय मंजूर करून घेण्यात येईल, जिथे पुस्तके सुरक्षित राहतील. जिल्ह्यातील प्रमुख वाचनाल्यामध्ये देवाण-घेवाण करून अधिकचे पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू.

भागवतराव सोनवणे,
संयोजक जलहक्क संघर्ष समिती येवला.

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!