सिन्नर :बिबट्या जेरबंद, धास्ती कायम…

सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील परिसर बिबट्यांच्या धास्तीने हादरलाय. रात्रीच्या अंधारात वनविभागाने लावलेल्या सापळ्यात देवपूर येथे अखेर एक बिबट् जेरबंद झाला असला तरी शेतकऱ्यांना वारंवार बिबट्यांचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्ती कायम आहे.
गेल्या काही दिवसांपासून सिन्नर तालुक्यातील देवपूर परिसर बिबट्यांच्या हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण होतं.आजूबाजूचा परिसर ऊस ,मका,शेतीचा असल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामं करण्या करिता खूप मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. .त्या नंतर वनविभागाच्या मदतीने शेतकरी मौजे- देवपूर श्री-संतोष पांडुरंग जगताप मालकी गट नंबर-169 मध्ये पिंजरा लावला होता. त्या पिंजऱ्यात शनिवार 20/12/2025 पहाटे 04.35 वाजेच्या सुमारास एक बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकून जेरबंद झाला.
बातमी वनविभागाला कळताच जेरबंद झालेला नर बिबट वय वर्ष अंदाजे तीन ते चार वर्षाचा असून सहाय्यक वन संरक्षक कल्पना वाघेरे,वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर ,यांच्या मार्गदर्शनाखाली
वनपाल सिन्नर तानाजी भुजबळ ,वनरक्षक सिन्नर श्री संतोष चव्हाण,वन्यजीव बचाव पथक रोहित लोणारे, निखिल वैद्य, मधुकर शिंदे, व वनकर्मचारी सिन्नर सदर जेरबंद झालेला बिबट हा महोदरी वन उद्यान सिन्नर येथे ठेवण्यात आला आहे.
नागरिकांना रात्री बाहेर जाणं टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे,तरी स्थानिक ग्रामस्थ आता अधिक सतर्क झाले आहेत. वनविभागाचं पथक परिसरात गस्त राबवत आहे.



