नाशिक ग्रामीण

शहा येथील बेकायदा खडी व दगड वाहतूक करणाऱ्या जे.से.बी.व ट्रक महसूल विभागाकडून जप्त….

आंदोलनाच्या काही तासांतच कारवाई झाल्याने ग्रामस्थांत समाधान व्यक्त...

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे

महसूल विभागाकडून  खडी वाहतूक करणाऱ्या मशिनरी वर बेधडक कारवाई

सिन्नर : दि . 28 ऑक्टोंबर 2025 शहा येथील बेकायदा खडी व मुरूम वाहतूक करणाऱ्या जे.सी.बी.व ट्रक महसूल विभागाकडून जप्त.. सामाजिक कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला काही तासांतच यश .
सिन्नर तालुक्यातील शहा येथे जलजिवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाच गावांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी जल तलावाचे काम चालू आहे.या तलावा तुन मोठ्या प्रमाणात दगड निघाला आहे व तो सर्व दगड जवळच गट नंबर  707 या जागेवर साठवला आहे. परंतु हा दगड शर्ती व अटी आणि प्रदुषण नियंत्रण प्राधिकरणाच्या नियमायचं परीपुर्ण पालन न करता सर्रास वाहतूक सूरू आहे. या कामासाठी संबंधित ठेकेदाराने खडी क्रेशर एक मशिन. तिन चार जे.से.बी.सह मोठा कामगार वर्ग व वाहतूक करण्यासाठी जवळ पास आठ – दहा हयवा ट्रक ह्या सर्व साधनसामग्री शहा येथे रात्रंदिवस खडी वाहतूक सुरू होती. या मालमत्तेचे वाहतूक करणाऱ्या कडुन शहा ग्रामपंचायत तीला ( गावाला )कुठलाही महसूल मिळत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने यासाठी परवानगी दिली नसल्याचे दिसून आले आहे. तरी अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असल्याचे काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात आले.‌ या सर्व प्रकाराची चौकशी केली जावी यासाठी विजय घोडेराव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येईल असे संबंधित विभागाला लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले. कार्यवाही न झाल्यास दिनांक 27 ऑक्टोबर पासून थेट त्याच जागेवर आंदोलन करण्यात येईल असे आवाहन केले होते. परंतु आंदोलनाच्या काही दिवस आधीच संबंधित ठेकेदाराने सर्व मशिनरी या जागेवरून हालवले व दगड व खडी वाहतूक बंद केली.. त्यानंतर आता आंदोलन रद्द झालं असावं असं अंदाज आल्याने या ठेकेदाराने पुन्हा जे.से.बी .आणले व काम सुरू करण्याच्या प्रयत्नात असतानाच जाहीर केल्याप्रमाणे दिनांक 27 ऑक्टोबर पासून थेट‌‌‌ जागेवर च आंदोलन सुरू केले तेव्हा या जे.से.बी.संदार्भात चौकशी केली असता सदरील प्रकार उघडकीस आला व आंदोलन कर्त्यांनी शहा मंडळ अधिकारी व तलाठी याच्या लक्षात आणून दिले. संबंधित सर्कल व तलाठी यांनी प्रतेक्ष जागेवर येऊन पाहणी केली व हा प्रकार बेकायदा असल्याचे स्पष्ट झाल्याने वावी पोलिस स्टेशनच्या मदतीने संबंधित मशिनरी जप्त करण्याची कारवाई केली व जागेवर पंचनामा करून जे.से.बी.व ट्रक वावी पोलिस स्टेशन ला जमा करून सर्कल. व तलाठी. शेख व कर्मचारी बैरागी यांनी पुढील कारवाई करण्यात येईल असे सांगितले. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शिंदे.नवनाथ वाघ. किसन सोनवणे . मौलाना अफजल.हे सहभागी झाले होते. या आंदोलनाला विजय घोडेराव.शिवाजी घोडेराव व शहा ग्रामस्थांनी पाठींबा दिला होता.. तुर्तास आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!