हरीत सायगाव’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद,,,, योगिता निघुट यांचा अभिनव उपक्रम
हरीत सायगाव’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद,,,, योगिता निघुट यांचा अभिनव उपक्रम

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव
येवला :दि. 25 ऑक्टोबर 2025
पावसाळ्याच्या सुरुवातीला योगिता निघुट यांनी येवला तालुक्यातील सायगाव गावातील महिलांना घरोघरी जाऊन केशर आंब्याची 2000 रोपे भेट दिली. पावसाळा आता संपल्यावर ही आंब्याची रोपे बहरली असून पुढील दोन वर्षांत प्रत्येक दारात केशर आंब्याचे झाड दिसणार आहे. या झाडांची मधुर फळे सर्वांना चाखायला मिळणार आहेत.
पेशाने शिक्षक असलेले वसंत निघुट यांनी पत्नी योगिता निघुट यांच्या या उपक्रमास साथ दिली. गावातील महिलांनी सर्व रोपांची लागवड करून त्यांचे संगोपन केले आहे.
गावातील महिलांच्या योगदानाचा सन्मान म्हणून वृक्षप्रेमी वसंत निघुट यांनी महिलांचा प्रतिनिधिक स्वरूपात ‘पैठणी’ देऊन गौरव केला.
लहान मुलांच्या हातून चिठ्ठी निवडून खालील भगिनींना सन्मानित करण्यात आले —
सौ. संगीता प्रकाश सोनवणे,
सौ. सरला भाऊसाहेब लोहकरे,
सौ. संगीता दीपक जानराव,
सौ. वत्सला रामनाथ रोकडे,
सौ. माधुरी योगेश ढाकणे.
या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व महिलांचे योगिता निघुट आणि वसंत निघुट यांनी मनःपूर्वक आभार मानले.
प्रतिक्रिया,,,,,,
आम्ही सर्व महिलांनी हरित सायगाव चे स्वप्नं बघितले असून.,पुढील पाच वर्षे हा उपक्रम आम्ही राबविणार आहोत…दर वर्षी विविध प्रकारच्या फळेझाडांची वाटप करून वृक्षारोपण केले जाणार आहे..पुढील वर्षी पंचवीस महिलांचे पैठणी देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी अनेक तरुण, उद्योजक आणि नोकरदार देखील सहभागी होणार आहे… योगिता वसंत निघुट
सदस्य ग्रामपंचायत सायगाव ता येवला



