नाशिक ग्रामीण

नांदगावजवळ NH-753 वरील स्वच्छतागृहे निष्क्रिय; दुर्गंधी

Nandgaon News

 


नांदगावजवळ NH-753 वरील स्वच्छतागृहे निष्क्रिय; दुर्गंधी व पाणीटंचाईमुळे वाहनधारक त्रस्त

वेगवान मराठी : मारुती जगधने

” दि . 23 नोव्हेंबर 2025 ”

चाळीसगाव–चांदवड मार्गावरील नॅशनल हायवे क्रमांक 753 वर नांदगाव जवळील पोखरी आणि गंगाधरी परिसरात उभारण्यात आलेली स्वच्छतागृहे व शौचालये सध्या पूर्णपणे निष्क्रिय झाली आहेत. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी विश्रांती आणि स्वच्छतेची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ही स्वच्छतागृहे बांधण्यात आली होती; मात्र प्रत्यक्षात त्यांचा कोणताही उपयोग होत नाही.

येथे अत्यंत दुर्गंधी, अस्वच्छता आणि पाण्याची पूर्णपणे अनुपलब्धता आढळून आली. स्वच्छतागृहाची नियमित साफसफाई होत नसल्याने ते वापरण्यास पूर्णपणे अयोग्य झाले आहेत. परिणामी, येथे वाहनधारक थांबण्यास टाळाटाळ करतात. काही प्रवाशांनी सांगितले की, “स्वच्छता नसल्यामुळे आणि पाणी नसल्याने ही सुविधा बांधली असली तरी प्रत्यक्षात ती व्यर्थ आहे.”

महामार्ग प्राधिकरणाने लाखो रुपयांचा निधी खर्च करून ही स्वच्छतागृहे उभारली; मात्र त्यांच्या देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने ही सुविधा कागदावरच असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि आरोग्यासाठी उभारण्यात आलेली ही सेवा निष्क्रिय अवस्थेत पडून असून त्वरित दुरुस्ती आणि नियमित देखभाल करण्याची मागणी स्थानिकांकडून पुढे येत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!