नाशिक ग्रामीण

फेसबुक लाईव्हवरून बदनामी; जिल्हा परिषद सदस्याच्या तक्रारीवरून युवकाविरुद्ध गुन्हा

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद, दि.२३ नोव्हें २०२३ :- माजी जिल्हा परिषद सदस्याची बदनामी केल्याप्रकरणी फेसबुक लाईव्ह करणाऱ्या प्रसाद निवत्ती घोटेकर या युवकाविरुद्ध फिर्यादी, अमृताताई वसंतराव पवार, व्यवसाय – जिल्हा परिषद सदस्य, देवगाव गट, रा.गंगापूर रोड, नाशिक यांनी दिलेल्या तक्रारीवरून लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रुई ता.निफाड येथे रस्ताप्रश्नी ग्रामस्थ उपोषणाला बसले होते. त्यावेळी दिनांक २१ नोव्हेंबर रोजी
दुपारी सुमारे १२.३० वाजेच्या सुमारास उपोषणस्थळी प्रसाद निवृत्ती घोटेकर रा.खेडलेझुंगे हा युवक फेसबुक पेजवरून लाईव्ह करत होता. यावेळी त्याने,’जिल्हा परिषद सदस्यांनी काहीच काम केले नाही, त्यांनी केलेले रस्ते निकृष्ट होते, ते पैसे खाणारे आहेत’ असे विधान प्रसारित केले. यामुळे आपली सार्वजनिक प्रतिमा मलिन झाल्याची तक्रार अमृताताई वसंतराव पवार यांनी लासलगाव पोलिसांकडे दिली. त्यांच्या तक्रारीवरून प्रसाद घोटेकर यांचे विरोधात गु.र.नं.८२३/२०२५ भा.न्या.संहिता कलम ३५६(२)प्रमाणे अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा.संदीप शिंदे करीत आहेत.

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!