नाशिक ग्रामीण

लासलगावमध्ये प्रतिबंधित गुटखा,जर्दा साठा जप्त; युवक अटकेत

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद, दिनांक १४ नोव्हेंबर :- लासलगाव पोलिसांनी साईनगर परिसरात छापा टाकत प्रतिबंधित गुटखा, जर्दा व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला असून एका तरुणास अटक करण्यात आली आहे.
दि.१३ नोव्हें रोजी दुपारी २.४० च्या दरम्यान लासलगाव पोलिस पथकाने शैलेश नंदकुमार बागमार, वय २१, रा.साईनगर, लासलगाव याच्या गाळ्यामध्ये छापा टाकला. यावेळी पोलिसांना महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू आणि जर्दा गुटखा मोठ्या प्रमाणावर साठवलेला स्थितीत आढळून आला. त्यात एकूण ९७२० रु.किमतीचा प्रत्येकी ३६० रु.किंमत असलेल्या सुगंधित पान मसाल्याच्या २७ पेट्या, गोवा पान मसाला १८ हजार रु किमतीच्या ५ गोण्या, १८३६० रु किंमतीचे शॉट नाव असलेले तंबाखुचे १०२ पुडे, ३६६० रु.किंमतीचा जी वन जर्दा नाव असलेले १२२ पुडे, २८५ रु.किंमतीचा झेड.एन.वन जाफरानी जर्दा नाव असलेले ५७ पाकिटे असा एकूण ५२,५९० मुद्देमाल आढळून आला. राज्यात सुगंधित तंबाखू, जर्दा आणि गुटखा यांच्या उत्पादन, साठवण आणि विक्रीवर बंदी असूनही आरोपी शैलेश बागमार यांनी आर्थिक फायद्यासाठी हा साठा ठेवला होता. त्यामुळे पो. कॉ. संदिप डगळे यांच्या फिर्यादीवरून बागमार यांचे विरोधात गु.र. २६१/२०२५ भा.न्या.संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. स.पो.नि.भास्करराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक किरण साळुंके अधिक तपास करीत आहेत.

 

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!