आरोग्य

गाडीमध्येच आरोग्य सेविकेकडून प्रसूती; धाडसी कृतीने वाचवले आई व जुळ्या मुलांचे प्राण ; साधना घोटेकर यांचा धाडसी निर्णय चर्चेत; मोबाईलच्या उजेडात पार पाडली प्रसूती

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दि.१२ नोव्हें :- सेवाभाव आणि तत्परतेचे अद्वितीय उदाहरण कोळगाव ता. निफाड येथे पहायला मिळाले. आरोग्य सेविका सौ.साधना संजय घोटेकर यांनी आपल्या धाडसी निर्णयाने आणि अनुभवाच्या जोरावर एका गर्भवती महिलेसह तिच्या जुळ्या बालकांचे प्राण वाचवले. त्यांच्या या सेवाभावी कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पहाटेची बिकट वेळ; कुटुंबीयांची धावपळ

कोळगाव येथील जाधव कुटुंबातील महिलेला पहाटेच्या सुमारास अचानक प्रसुतीवेदना सुरू झाल्या. परिस्थिती बिकट होताच कुटुंबीयांनी आरोग्य सेविका साधना घोटेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेत महिलेची तपासणी केली व तिला निफाड येथे नेण्याचा निर्णय घेतला.

नैताळे शिवारात प्रसुती; मोबाईलच्या उजेडात गोंडस बाळाचा जन्म

गाडी नैताळे शिवाराजवळ पोहोचताच प्रसुतीवेदना तीव्र झाल्या. परिस्थितीची गंभीरता ओळखून साधना ताईंनी आपल्या १८ वर्षांच्या अनुभवाचा उपयोग करत, महिलेसोबत असलेल्या तिच्या आईच्या मदतीने मोबाईलच्या उजेडात गाडीतच एका गोंडस बालकाला सुरक्षित जन्म दिला.
यानंतर दुसऱ्या बालकाची प्रसूती निफाड ग्रामीण रुग्णालयात सुरक्षितपणे पार पडली.

धैर्य आणि सेवाभावाचा नमुना

या संपूर्ण प्रसंगात कोणतीही वैद्यकीय साधनं किंवा योग्य प्रकाश नसताना देखील प्रसूती यशस्वीपणे पार पाडण्यात साधना घोटेकर यांनी दाखवलेले धैर्य आणि निर्णयक्षमता अनुकरणीय ठरली. आई आणि दोन्ही बालक सुखरूप असून उपचारासाठी दाखल आहेत. गावकरी आणि जाधव कुटुंबीयांकडून साधना घोटेकर यांच्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक करण्यात येत आहे.

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!