नांदगाव येवला रोड वरील सोमठाणे येथे अपघात मुलगा ठार पिता गंभीर
- नांदगांव येवाला रोडवर सोमठाणे येथे अपघात एक ठार एक गंभीर !
वेगवान मराठी दि 5 ऑगस्ट : मारुती जगधने
नांदगाव शहरापासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावरील नांदगांव ते येवला रोडवर सोमठाणे तालुका येवला येथे छोटा हत्ती टेंम्पो व मोटार सायकल अपघातामध्ये झालेल्या घटनेत खडकी तालुका कोपरगाव येथील एक तरुण ठार झाला असून त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहे .
या घटनेमध्ये मुलगा ठार झाला असून पिता गंभीर जखमी झालेला आहे .सदर अपघात सात जुलै रोजी झाला असून घटनेतील व्यक्ती गंभीर जखमी असल्याने उपचारानंतर त्यांनी 4 ऑगस्ट रोजी येवला पोलिसात अपघाताच्या घटनेची नोंद केलेली आहे .
त्यावरून घटनेची येवला पोलिसांनी दखल घेत पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली आहे .
येवला तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर व कलम 311 /.2025भारतीय न्याय संहिता कलम 281, 106 (1) ,125 (A) ,125 (B) ,324 (4),मोटर वाहन कायदा कलम 184 ,135 177 प्रमाणे ।गुन्हा दाखल येवला ते नांदगाव रोडवर सोमठाणे जोश गावाजवळील बस स्टॅन्ड चे समोर तालुका /येवला येथे ही घटना दिनांक सात / सहा /दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली
वरील घटने संदर्भात सदर ठिकाणी यातील छोटा हत्ती टेम्पो क्रमांक एम एच झिरो चार /एच वाय 90 70 चे वरील चालक ना व, गाव माहित नाही सदर वाहन चालकाने येवला ते नांदगाव रोडने नांदगाव बाजू कडून जोरात येऊन त्याचे समोरील येवला बाजूकडून नांदगाव बाजूकडे जाणारी मोटरसायकल नंबर एम एच 17 / डीबी 46 65 हीस ठोस मारून अपघात करून अपघातात दोन्ही वाहनांचे तसेच साक्षीदार सुनील बाळासाहेब आराख (वाघ) यांचे गंभीर दुखापती व मुलगा अतुल आप्पासाहेब आराख वय 18 राहणार खडकी तालुका कोपरगाव जिल्हा आहिल्या नगर यांचे मरणस तसेच दोन्ही वाहनांचे नुकसानीस कारणीभूत होऊन अपघात करून पळून गेला आहे .
म्हणून गुन्हा दाखल फिर्यादी हे दुखापत असल्याने उशिराने पोलीस स्टेशनला हजर होऊन तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .
सदर घटनेतील फिर्यादी आप्पासाहेब पुंडलिक आराख वय 54 राहणार खडकी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांनी खबर दिलेली आहे .
घटनेचा तपास पोलीस निरीक्षक मंडलिक हे करीत आहे



