येवला विधानसभा मतदारसंघाचे बाहुबली नेतृत्व — सलग पाच टर्म!
येवला विधानसभा मतदारसंघाचे बाहुबली नेतृत्व — सलग पाच टर्म!

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव
येवला: दिनांक :14 ऑक्टोबर /येवला विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व मंत्री छगन भुजबळ हे सलग पाच टर्म करत आहेत.
शतायुषी माणसाच्या आयुष्यातही २५ वर्षे हा मोठा टप्पा असतो… त्या अर्थाने आता दोन तपानंतर मंत्री भुजबळ हे पूर्णपणे “येवल्याचे” झाले आहेत.
जनतेने त्यांना प्रदीर्घ काळ येवल्याची सूत्रे हातात देण्याचे कारण म्हणजे — पहिल्या निवडणुकीपासूनच त्यांनी कामाचा जो धडाका सुरू केला तो सतत वा परिवर्तनाचा प्रवास
सुरुवातीला राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग वगळता लोकांना डांबरी रस्ते माहीत नव्हते.
पहिल्याच पंचवार्षिक योजनेत त्यांनी ग्रामीण रस्त्यांचा कायापालट केला.
पण त्याहूनही मोठे काम त्यांनी केले —
दुष्काळी येवला तालुक्यातील जलसंधारणासाठी नव्या पॅटर्नची निर्मिती.
आमदार निधीतून मंदिरे किंवा मंडप बांधण्याऐवजी जिथे जिथे पाणी अडविण्याच्या जागा असतील,
तिथे सिमेंट प्लग बंधारे बांधले.
एकूण १४४ बंधारे बांधल्याने शेतशिवाराजवळच पाणी अडले आणि हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
त्यासोबत जुन्या पाझर तलाव आणि साठवण तलावांची डागडुजीही केली गेली.
*पुणेगाव-दरसवाडी कालवा आणि डोंगरी भागाचे आव्हान
पुणेगाव-दरसवाडी कालव्याला पाणी आणणे हे अत्यंत जिकिरीचे काम होते.
हे काम दुसऱ्या कोणाकडून झालेच नसते, असे विरोधकही मान्य करतात.
मात्र सर्वात मोठा प्रश्न होता —
डोंगरी भागातील गावांचा, जिथे कालवा पोहोचू शकत नव्हता.
या भागासाठी जलसंधारणाचे वेगळे उपाय आवश्यक होते.
मी मंत्री भुजबळ यांच्याकडे उत्तर-पूर्व भागातील साठवण तलावांचे प्रस्ताव मांडले,
मात्र त्या सर्व जागा वनविभागाच्या मालकीच्या होत्या.
🌳 *वनविभागाच्या अडचणी व संघर्षाचा प्रवास*
मंत्री भुजबळ हे राज्यातील अनुभवी नेते असल्याने त्यांना वनविभागाच्या अडचणींची जाणीव होती.
प्राथमिक सर्वेक्षणासाठीसुद्धा होकार मिळत नव्हता.
माझा मुद्दा होता —
देशातील सर्व धरणे वनविभागाच्या जमिनीवरच झाली आहेत, नागरी वस्तीत नव्हे.
या विषयावर आमच्यात अनेकदा वाद झाले.
मुंबईतील एका बैठकीत त्यांनी मला विचारले —
“
तुला झुडूप-जंगल कळते का? जा, तिकडे कोणाकडून करून घ्यायचे ते घे.”
असे म्हणत मला हाकलले.
पण काही मिनिटांतच सुरक्षा कर्मचारी आणि अधिकारी मला शोधत आले.
मंत्री भुजबळ यांनी मला पुन्हा बोलावले,
चहा दिला आणि म्हणाले —
*“तुझी तळमळ बघून आपण प्रयत्न करू.”*
ही घटना २०१३ सालची.
आज २०२५ — बारा वर्षांनी,
ममदापूर साठवण तलाव आणि देवनाचा साठवण तलाव या दोन्ही योजनांसाठी
एकूण १२८ हेक्टर वनजमीन जलसंधारण खात्याकडे हस्तांतरित झाली आहे.
💧 *आता जलसंपन्नतेकडे प्रवास*
ममदापुर साठवण तलावाचे प्रत्यक्ष काम सुरू असून
२०२६ च्या पावसाळ्यात पाणी अडलेले दिसेल.
देवनाचा साठवण तलावाचे कामही उन्हाळ्यात सुरू होऊन पूर्णत्वाकडे जाईल.
देवनाचा हा प्रकल्प नव्याने मागणी झालेला असून,
मंत्री भुजबळ यांनी त्याचे कोणतेही पूर्वीचे आश्वासन दिले नव्हते —
तरीही ते शक्य झाले.
ममदापुर प्रकल्पाची फाईल कधीच जलसंधारण खात्यापर्यंत पोहोचली नव्हती,
तरीही आज ती प्रत्यक्षात साकारते आहे.
अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झाल्या —
हेच भुजबळ साहेबांच्या कार्यतत्परतेचे प्रमाण आहे.
🚰 *राजापूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना*
राजापूरसह ४१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी
जेव्हा नळाद्वारे गावठाणात पोहोचेल,
तेव्हा प्रत्येक लाडक्या बहिणीला तुमची आठवण येईल, साहेब!
💐 वाढदिवस संदेश
> साहेब, आपल्या कार्यतत्परतेमुळे ग्रामीण भागात जलसंपन्नता, विकास आणि जनकल्याणाचे नवीन पर्व सुरू झाले आहे.
आपल्या जनसंपर्क, जनहित आणि विकासकार्याचा प्रवास असाच प्रेरणादायी राहो.
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!
— भागवतराव सोनवणे
संयोजक, जलहक्क संघर्ष समिती, येवला
8806272733



