लोकल बातम्या

विज मंडाळाच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी घराला आग…तिन लाखाचे नुकसान… जिवित हानि नाही

गावकऱ्यांनी केला संताप व्यक्त, कुटुंबाला आर्थिक हातभाराची शासनाकडून अपेक्षा

वेगवान नाशिक /  भाऊसाहेब हांडोरे

  • …   विद्युत वितरणाचा भोंगळ कारभारामुळे या गावातील घराला आग… संसार युक्त वस्तू जळुन खाक… जिवित हानी नाही

सिन्नर : दिनांक . 24 ऑगस्ट 2025 — ,सिन्नर तालुक्यातील सरहद्दीवर कोपरगाव तालुक्यात गौतम साखर कारखाना जवळ असलेल्या सुरेगाव येथील बंडु गेठे यांच्या घराला अचानक आग लागली व या आगीत घरातील रोख रक्कम चाळीस हजार, टिव्ही.फ्रिज. लाकडी फर्निचर, वर्षाभरासाठी साठवून ठेवलेले धान्य भस्मसात झाले आहेत तसेच शिलाई मशिन सह ग्राहाकांचे शिवण्यासाठी आलेल्या कापड व तयार ड्रेस,लेडीज ब्लाऊज आणि शालेय साहित्य या सर्व वस्तू जळुन खाक झाल्याने या कुटुंबातील सदस्यांनी महावितरण कंपनीला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व सरकारकडून मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे..

  • शनिवार दुपारी चार ते पाच वाजेच्या दरम्यान विद्युत मंडळाच्या वतीने काही काम चालू होते परंतु या वेळी कर्मचारी व अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे शॉटसर्किटमुळे आग लागली असल्याचे माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.. घरातुन धुर निघत आहे हे कुटुंबातील वृद्ध आजीच्या लक्षात आल्यानंतर ती शेजारील नागरीकांना हि बातमी समजताच शंकरराव सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख यांना सांगितले व त्वरित अग्निशमन दलाचे कर्मचारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने आग आटोक्यात आणली.सुदैवाने कुठलीही जिवित हानि झाली नाही…

या दरम्यान घरात कुटुंबातील कोणीही व्यक्ती नसल्याने जिवित हानी झाली नाही असे असले तरी या कुटुंबांचे जवळपास अडीच- तिन लाख रुपयांची नुकसान झाले आहे त्यामुळे हे कुटुंब पुर्ण निराधार झाले आहे त्यामुळे हतबल झालेल्या या कुटुंबाला आर्थिक हातभार लावला जावा व शासकीय पातळीवर मदत केली जावी या कुटुंबाला आधार द्यावा व पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी कुटुंबातील सदस्यांनी व सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे..

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!