नांदगाव तहसील कार्यालयात तहसीलदार सुनील सौंदणे यांच्या हस्ते ध्वजारोहण….
वेगवान मराठी : मारुती जगधने
नांदगाव येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त नांदगाव तहसील कार्यालयाच्या आवारात भव्य ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नांदगावचे तहसीलदार सुनील सैंदाणे यांनी उपस्थित राहून राष्ट्रध्वज फडकावला.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रीय गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. तहसीलदार सैंदाणे यांनी आपल्या मनोगतात स्वातंत्र्य सेनानींच्या त्यागाची आठवण करून देत नागरिकांना सामाजिक एकोपा, प्रामाणिक प्रशासन व राष्ट्रहितासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, पोलीस विभागाचे अधिकारी, विविध शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.राष्ट्रगीत, राज्यगीत,ध्वजगीत म्हणत सलामी देण्यात आली. यावेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहीदांना अभिवादन करून तहसीलदार सौंदणे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्यात.
तहसील कार्यालयात ध्वजारोहण प्रसंगी पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे,नायब तहसीलदार यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक,पत्रकार, तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी एन सी सी कॅडेट कोर ने पंथ संचलन करत उपस्थिस्तांचे लक्ष वेधले. ।



