Uncategorizedनाशिक ग्रामीणलोकल बातम्या

परतीच्या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान; शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी

परतीच्या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान; शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी

वेगवान मराठी : मारुती जगधने 

नांदगाव : [दि . 20 सप्टेंबर 2025 ]

आगामी काळात राज्यभरात परतीच्या पावसाचा प्रकोप वाढण्याची शक्यता हवामान विभागासह विविध हवामान तज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने नांदगांव  तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी केले आहे.

राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी ३० जिल्ह्यांमधील १९५ तालुक्यातील ६५४ महसूल मंडळांमध्ये एकूण ६२ लाख १७ हजार ५४० एकर शेतीचे नुकसान झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. अनेक ठिकाणी शेतजमीन वाहून गेली असून पिकांचे संपूर्ण नुकसान झाले आहे.

दरम्यान, राज्य सरकारने नुकतेच मदतीचे निकष बदलून फक्त २ हेक्टर क्षेत्रापर्यंतच मदत देण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार शेतकऱ्यांना जास्तीत जास्त १७,००० रुपये मिळणार आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांच्या झालेल्या प्रचंड नुकसानीच्या तुलनेत अत्यल्प असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याशिवाय पंचनामेही संथगतीने व प्रत्यक्ष बांधावर न जाता केल्याच्या तक्रारी राज्यभरातून येत आहेत.

पावसामुळे जमीन लागवडीस अयोग्य ठरत असून जमिनीचे नैसर्गिक नुकसान झाल्यास भविष्यात पोटखराबा नोंदणी आणि जमीन पुन्हा शेतीसाठी वहिती करण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात शासनाचा ठोस निर्णय जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय लक्षात घेऊन सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपये सरसकट भरीव मदत द्यावी, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा नांदगांव वतीने करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!