लोकल बातम्या

मुस्लिम बांधवाकडून दिवाळीनिमित्त सिन्नर करांना लाखोंच्या भेटवस्तू चे वाटप….

वेगवान नाशिक /  भाऊसाहेब हांडोरे

सामाजिक ऐक्य व एकात्मतेचं घडवलं दर्शन….

सिन्नर  ; दि , 21 ऑक्टोबर  2025 —    मुस्लिम बांधवाकडून दिवाळीनिमित्त सिन्नर करांना लाखोंच्या भेटवस्तू व प्रत्येक सभासदांना पैठणीचे वाटप….

 सामाजिक ऐक्य व बांधिलकी कायम ठेवत कोळगाव माळी येथील मुस्लिम समाजाचे पिरसाई दूध संकलन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष शाकीर भाई शेख यांनी गेल्या सात वर्षापासून दूध संकलन सुरू केले असून त्या संकलनाची घोडदौड मोठ्या दिमाखात सुरू असुन मागील वर्षी जवळपास तीन लाखापर्यंत बक्षीसाची वाटप केली होती ती परंपरा कायम राखत शाकीर भाई यांनी यावेळी  दोन सभासदांसाठी लकी ड्रॉ काढला असून त्याच्यात होंडा कंपनीची मोटरसायकल ( पहिले  बक्षीस )  संदीप रामभाऊ कदम यांना  तर दुसरे बक्षीस सुरेश मच्छिंद्र गायकवाड यांना इलेक्ट्रिक मोटरसायकल ही लागली आहे .  हे दोन्ही सभासद मानकरी ठरलेले आहे.तर तिसरे बक्षीस प्रमोद धामणे यांना( फ्रिज,)  संदीप गुलाब शेख यांना ( पिठाची गिरणी .) सौ.नंदिनी जुंधारे ( मोबाईल . ) किरण सोमनाथ भोकर  (रबरी मॅट ) गणेश गणपत वाबळे( कुलर) आणि लक्ष्मण मोकळ ( मिक्सर ) बालम मिया पटेल क्राफ्ट . जावेद भैय्या पटेल ( इलेक्ट्रिक शेगडी ) गणेश शिंदे ( दोन खुर्च्या )आणि बाराव बक्षीस लकी ड्रॉ पद्धतीने काढून इरफान चॉंद शेख यांना मिल्किंग मशिन मिळाले आहे. तर इतर सर्व सभासदांना प्रतेकी एक पैठणी साडी चे दिवाळी भेट म्हणून  वाटप करण्यात आले…
Oplus_131072
          @  यावेळी पिरसाई दूध केंद्राचे संचालक शाकीर भाई शेख यांनी दुध उत्पादक शेतकऱ्यांना एक नव्या मोठ्या बक्षिसाची घोषणा केली आहे., पुढील पाच वर्षे जो दुध उत्पादक एक नंबर क्वालिटीचे व सर्वात जास्त दूध घालणाऱ्या सभासदांना संस्थेच्या 11 व्या वर्धापनदिनी चार चाकी कार देण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे… वरील बक्षीस हे लकी ड्रॉ पद्धतीने काढण्यात येईल यांची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन केले केली आहे. @

या कार्यक्रमाला माजी सरपंच अंबादास कदम. वाल्मीक झुंजारे .बंडू कुमावत . मा. सरपंच उत्तम मोकळ. सर्जेराव चंदे .बाळासाहेब कदम. गुलाब पटेल. अल्ताफ पटेल. धामणे साहेब. माणिक चंद्रे. बबलू शेख . दिलीप चंद्र आदी मान्यवर  उपस्थित होते .प्रास्ताविक मागील सरपंच  उत्तम मोकळ यांनी केले तर आभार संस्थेचे चेअरमन शाखीव भाई यांनी मानले आहे .

या कौतुकास्पद समारंभा बाबत शाकीर भाई याचं सिन्नर व कोपरगाव तालुक्यात कौतुक केलं जातं आहे…

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!