आईसमोर बाळाला उचलून नेले : बिबट्याचा हल्ल्यात दिड वर्षांच्या बालकाचा मृत्यू…
आईसमोर बाळाला उचलून नेले : बिबट्याचा हल्ल्यात दिड वर्षांच्या बालकाचा मृत्यू...

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर: दि , 14 सप्टेंबर 2025 — बिबट्या ….. नाव काढताच अंगावर काटा उभा राहतो कारण बिबट्याचा मुक्त संचार आणि प्राणघातक हल्ले हे आता तालुक्यातील जेणतेला नवीन राहीले नाही या प्राण्यांचा बिनधास्त वावर वाढला असून शाळकरी मुलांना व वृध्द व्यक्ती यांना प्रचंड धोका निर्माण झाला आहे यात अनेक निष्पाप.निरागस जिव गमवावे लागले आहेत… तालुक्यातील पंचाळे येथील बिबट्याचा हाल्यात एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला.. सारंग थोरात असे बळी पडलेल्या मुलाला वाचवण्यात यश आले नाही हि घटना ताजी असतानाच दुसरीकडे मात्र बिबट्याची हिंमत वाढली असून शनिवारी सायंकाळी सात च्या दरम्यान खडांगळी येथे एका दिड वर्षांच्या बालकाला उचलून नेले व दोनशे फुटांवर नेऊन कुठुंबासमोरच आपल्या बाळाला जिवंत खाल्ले.. व मृत्युमुखी पडलेल्या मुलाला अर्धवट अवस्थेत सोडून बिबट्या प्रसार झाला…
तालुक्यातील खडांगळी येथील अर्जुन संपत कोकाटे यांच्या निमगाव शिवारात शेती आहे. सोयाबीन सोगंणी साठी कोकणातुन मोठ्या प्रमाणावर मजुर येत असतात.कोकाटे यांनी काही मजुर आपल्या शेतात कामासाठी आणले होते.. पावसामुळे हे सर्व मजुर कांदा चाळीत आसरा घेतला.. समोर दिड वर्षांच्या बाळ ठेवून आई कामात व्यस्त असल्याने बिबट्याने बाळावर प्राणघातक हल्ला चढवला व सर्वांसमोर मुलाला उचलून नेले व दोनशे फुटांवर नेऊन कुठुंबासमोरच मुलाला खाल्ले… व मृत्युमुखी पडलेल्या मुलाला अर्धवट अवस्थेत सोडून बिबट्या प्रसार झाला… अखेर परीसरातील ग्रामस्थ व शेतकरी यांनी शोध घेतला असता सदर बालक जवळच असलेल्या पिकांत मृत अवस्थेत आढळून आला.. बिबट्याच्या तावडीतून सोडवून घेतला परंतु यश आले नाही..
मृत्युमुखी पडलेल्या बालक गोलु युवराज शिंगाडे ( वय- दिड वर्ष )याला नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर कुटुंब हे पेठ तालुक्यातील कुबांळे या गावातील असुन मंजुरीसाठी आलेल्या आईवडील बरोबर गोलु आला होता. परंतु काळानं घात केला व डोळ्यांदेखत आपल्या मुलाला बिबट्याने उचलून नेले व व जिवंत खाल्ले…
बिनधास्त वावर वाढल्याने शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे संध्याकाळ झाली की संपूर्ण तालुका दहशतीखाली वावरत आहेत.. रात्री अपरात्री घराबाहेर पडणं मुश्किल झाले आहे…
बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक वेळा उपोषण.अदोलने झाली आहे परंतु निगरगट्ट लोकप्रतिनिधींना याचा काही फरक पडत नाही उलट या घटनेकडे दुर्लक्ष करून काना डोळा करत आहेत परंतु या सर्व गोष्टींचा जाब जनता विचारल्या शिवाय राहणार नाही..
वनाधिकारी यांच्या वर रोष व्यक्त करण्यापेक्षा तालुक्यातील विकास पुरूष काय झोपा काढतात का.. जनसेवक म्हणून स्वतः ला मिरवुन घेणारे आता दिल्लीला जाऊन बसले काय असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत… आता या पुढे जोपर्यंत बिबट्या फीरतो तोपर्यंत स्थानिक पुढार्याना तालुक्यात फिरू देणार नाही असा इशारा प्रहार जनशक्ती संघटना व संघर्ष समिती आणि त्याचबरोबर सर्व स्तरातून दिला आहे..
साहेब…. बिबट्याला पकडा व जनतेला वाचवा… अशी आर्त हाक तालुक्यातील नागरिक मारत बिबट्या पासून कायमची सुटका करून जनतेला दिलासा द्या अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे..
आईसमोर बाळाला उचलून नेले : दिड वर्षांच्या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू….



