नाशिक ग्रामीण

या घाटात मालवाहू ट्रकचा मोठा अपघात

Nandgaon news

 या घाटात मालवाहू ट्रक चा मोठा अपघात  .

वेगवान मराठी :  मारूती जाधने 

नांदगाव तालुका (दि. १४ सप्टेंबर 2025) –
नांदगाव तालुक्यातील कासारी घाटाच्या वरच्या बाजूला, बोलठाण मार्गावर रविवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. बोलठाण भागातून नांदगाव दिशेने येणारा टमाट्याने भरलेला मालवाहू ट्रक अचानक नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाला.ही घटना नांदगाव तालुक्यातील कुसुम तेल शिवारात घडली .

या अपघातात वाहनातील मोठ्या प्रमाणातील टमाट्यांचा माल रस्त्यावर सांडला असून शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.शिवाय मा ल ट्रकचे देखील मोठे नुकसान झालेले आहे .

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मदतकार्य सुरू करून गंभीर जखमी झालेल्या ट्रक चालकाला बाहेर काढले आणि उपचारासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात हलवले. चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.


अपघाताचे संभाव्य कारण

  • घाटातील तीव्र वळणांवरून येताना ट्रकवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक अंदाज आहे.
  • अपघातामुळे या भागातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
  • नांदगाव बोलठाण  मार्गावरती सातत्याने वाहतुकीची प्रचंड वर्दळ असते कन्नड घाट बंद असल्याने कन्नड भागातून मालवाहू ट्रक आणि इतर वाहनांची वाहतूक बोलठाण कासारी  मार्गे छ . संभाजीनगर कडे जात असते त्यामुळे या भागाला रस्त्यांच्या किनारी आणि मध्यभागी मोठ्या प्रमाणात खचलेला रस्ता असल्याने लहान-मोठे अपघात घडत असतात हे या अपघाताचे मुख्य कारण कळू शकले नाही .मात्र अपघातामध्ये वाहन चालक  नागरिकांनी तत्काळ दाबलेल्या ट्रक खालून बाहेर काढून उपचारासाठी दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!