नाशिक ग्रामीण

श्री उद्धव महाराजांच्या 379 व्या जयंतीनिमित्त सोमवार दि.१ सप्टेंबर पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

श्री उद्धव महाराजांच्या 379 व्या जयंतीनिमित्त सोमवार दि.१ सप्टेंबर पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

वेगवान नाशिक/तुषार रौंदळ

सटाणा दि.३१ऑगस्ट २०२५

मुल्हेर तालुका बागलाण येथे जागृत देवस्थान श्री उद्धव महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो. गेल्या 323 वर्षाची परंपरा असलेला हा सप्ताह याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. भाद्रपद शुद्ध नवमी ही उद्धव महाराजांची जन्मतिथी असल्याने त्या दिवशी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ झाला. यात अखंड समाजनिहाय अष्टोप्रहर प्रहारा केला जातो. तसेच रोज सकाळी व सायंकाळी महाआरती सायंकाळी हरिपाठ व रात्रभर परिसरातील श्री नरेंद्र माऊली फक्त परिवाराच्या भजनी मंडळाच्या वतीने भजन व गायन केले जाते. सप्ताहाची सांगता रविवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी श्री उद्धव महाराजांच्या पालखी मिरवणुकीने होईल या निमित्ताने मुल्हेर येथे तीन दिवस श्री रामलीला म्हणजेच बोहाडा साजरा केला जातो. विविध देवदेवतांच्या मुखवट्यांची मिरवणूक काढली जाते.

यास कोणी रामलीला तर कोणी सोंगाचा कार्यक्रम म्हणतात. संपूर्ण गावात यात्रा भरते. सप्ताह यशस्वीतेसाठी श्री उद्धव महाराज नामसप्ताह समितीचे अध्यक्ष सुनील चव्हाण, सचिव शेखर पंडित, सदस्य तुळशीराम जगताप, बापू कुटे, सुरेश बत्तीसे, बळवंत गायकवाड,सरपंच निंबा भानसे, उपसरपंच योगेश सोनवणे, भिकाशेठ बागुल, सतीश शुक्ल, पंडित दादा जगताप, रामचंद्र खरे, बन्सीलाल बत्तीसे, सुनिल येवला,संजय उपासनी, प्रतिक येवला यांच्यासह सर्व ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहेत.

तुषार रौंदळ

पत्रकारिता क्षेत्रात गेल्या २५वर्षापासुन असुन मी दैनिक लोकमत, दैनिक सकाळ, दैनिक दिव्य मराठी,दैनिक गावकरी, दैनिक आपलं महानगर यात पत्रकारिता केली असुन मला राजकीय, सामाजिक आर्थिक, पौराणिक ऐतिहासिक,कला क्रीडा यांचा सखोल अभ्यास केला असुन ते वेळोळी माझ्या लेखणीतून दिसली आहे.तसेच सोशल मीडिया,युटुब चॅनल वर चा मला १०वर्षाचा अनुभव आहे. तुषार रौंदळ हे बागलाण तालुक्यातील सटाणा येथून वेगवान नाशिक चे प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!