नाशिक ग्रामीण

धक्कादायक.. साक्री शिर्डी महामार्गावर अपघात,तीन जागिच ठार

वेगवान नाशिक/तुषार रौंदळ

सटाणा दि.८सप्टेंबर २०२५:- साक्री शिर्डी महामार्गावर वि वनोली जवळ सकाळी ११ वाजेच्या सुमारास बस आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला.या अपघातात सटाणा येथील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये सटाणा शहराजवळील सुकडनाला परिसरातील,आदिवासी कुटुंबातील विकी दयाराम माळी (वय १९), रोशन दयाराम माळी (वय २८) आणि गोविंद काळू पवार (वय ३८) यांचा समावेश आहे. विकी आणि रोशन हे दोघेही सख्खे भाऊ असल्याची माहिती आहे. हे तिघे जण एकाच दुचाकीवरून सटाण्यावरून ताहाराबादकडे दुचाकी क्रमांक MH 41 BS 4124 ने जात असताना, ताहाराबादकडून सटाण्याकडे येणार्‍या नंदुरबार-वसई बस क्रमांक MH 14 LX 8849 सोबत समोरासमोर धडक झाली.

हा अपघात इतका भीषण होता की मोटार सायकल बसच्या पुढील भागात पूर्णपणे घुसुन तिचा चक्काचूर झाला. यात दुचाकीवरील या तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय राऊत, सुधीर साप्ते, बाळासाहेब टिळेकर, निंबा खैरनार, योगेश पवार, सिकंदर कोळी, किशोर सूर्यवंशी आणि नितीन जगताप यांनी घटनास्थळी धाव घेत मृतांना तात्काळ शासकीय रुग्णालयात हलविले पंचनामा करून पुढील तपास सुरू केला. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती व दुतरफा वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. यावेळी पोलिसांना वाहतूक सुरळीत करताना मोठी कसरत करावी लागली.

तुषार रौंदळ

पत्रकारिता क्षेत्रात गेल्या २५वर्षापासुन असुन मी दैनिक लोकमत, दैनिक सकाळ, दैनिक दिव्य मराठी,दैनिक गावकरी, दैनिक आपलं महानगर यात पत्रकारिता केली असुन मला राजकीय, सामाजिक आर्थिक, पौराणिक ऐतिहासिक,कला क्रीडा यांचा सखोल अभ्यास केला असुन ते वेळोळी माझ्या लेखणीतून दिसली आहे.तसेच सोशल मीडिया,युटुब चॅनल वर चा मला १०वर्षाचा अनुभव आहे. तुषार रौंदळ हे बागलाण तालुक्यातील सटाणा येथून वेगवान नाशिक चे प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!