महाविद्यालयात भव्य रोजगार मेळावा; 246 विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्तीपत्र
Nandgaon news
महाविद्यालयात भव्य रोजगार मेळावा; 246 विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्तीपत्र
वेगवान मराठी : मारुती जगधने
दिनांक . 6 मार्च 2026
मविप्र समाजाचे नांदगाव महाविद्यालय व CII-MCC नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला.
महिंद्रा सोना लि., बॉश, टाटा मोटर्स, ब्लिंकीट, किर्लोस्कर, बजाज, टापारिया टूल्स लि. यांसह 50 हून अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग होता.
मेळाव्यात सुमारे 246 विद्यार्थ्यांना मुलाखतीनंतर तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र नांदगाव तालुका संचालक अमित बोरसे होते.
विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने संधींचा लाभ घ्यावा आणि मिळालेल्या नियुक्तीवर रुजू होण्यासाठी मानसिक तयारी ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
प्राचार्य डॉ. एन. यू. पाटील यांनी मेळाव्याची पार्श्वभूमी स्पष्ट करत दहावी, बारावी, ITI, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना बँकिंग, फायनान्स, मेडिकल, ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंग आदी क्षेत्रात संधी उपलब्ध झाल्याचे सांगितले.
या मेळाव्यासाठी 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. महाविद्यालयाच्या इतिहासातील हा पहिलाच एवढा मोठा रोजगार मेळावा असल्याचे त्यांनी नमूद केले.
CII-MCC चे मॅनेजर सागर शिरसाठ यांनी उपस्थित तरुणांना विविध कंपन्यांची माहिती देत सर्व कंपन्यांच्या HR प्रतिनिधींशी संवाद साधण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला परिसरातील मान्यवर, प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. एस. प्रसाद यांनी केले तर प्रा. डी. वाय. तुंगार यांनी आभार मानले.



