नाशिक:काळे धंदे खाकी हात मटक्यावाल्यांचं पोलिसांचे साटलोट

वेगवान नाशिक / सागर मोर
वणी – आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात असल्याची भीती व्यक्त होत आहे. कारण अगदी उघड्यावर शेड टाकुन उघड्यावर मटका घेतला जात आहे.तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे सर्व अवैध धंदे बिनबोभाट सुरू आहे.
मागील पंधरा दिवसा पुर्वी चिंचखेड ग्रामस्थांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच इतर ठिकाणी निवेदने पाठवुन अवैध धंदे कसे फोफावले आहे ते बंद करावे या साठी निवेदने दिले तसे वणी पोलिस ठाण्यात ही निवेदन दिले परंतु राजरोस चालणारा मटका काही बंद झाला नाही उलट उघड्यावर बिनबोभाट सुरू झाला सध्या शहरात अवैध दारू, मटका, गांजा आणि इतर अंमली पदार्थांची विक्री वाढल्याने सामाजिक वातावरण दूषित झाले आहे.
याचा थेट परिणाम शहरातील शांतता आणि सलोख्यावर होत आहे.शहरातील वाढलेल्या अवैध व्यवसायांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना बळ मिळत आहे. विशेषतःअवैध मटका दारू आणि अंमली पदार्थांचे धंदे चालवणाऱ्यांचे मनोबल वाढले असून, ते उघडपणे हे धंदे करत आहेत.
विशेष म्हणजे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय शहरात असूनही त्यांच्याच नाकाखाली अवैध दारूची विक्री बिनबोभाट सुरू असल्याचा आरोप होत आहे. या विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने अवैध धंद्यांना एकप्रकारे प्रोत्साहन मिळत असल्याचे चित्र आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाढती चिंता पुढील काही महिन्यांत होऊ घातलेल्या निवडणुका पाहता, या अवैध व्यावसायिकांचा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.
अशा असामाजिक तत्त्वांचा वापर दबावतंत्रासाठी होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. वणीच्या कायदा-सुव्यवस्थेसाठी ही एक धोक्याची घंटा असून, पोलीस प्रशासनाने यावर तातडीने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.वांरवार प्रसार माध्यमातून बातम्या प्रसारित होऊन ही सुस्तावलेल्या पोलीस यंत्रणेस सोयरसुतक नाही.
पोलिसांची हास्यास्पद कारवाई:-
सध्या पावसाळ्याचे दिवस असुन भरपावसात पत्रीशेडच्या बाजुला बसुन चौघे जण बावनपत्ती जुगार खेळतांना पोलिसांनी अटक केली.ज्यांना अटक केली त्यांच्यावर अश्या प्रकारच्या अनेक केसेस केलेल्या आहे.सलग चार महिन्या पासुन पाऊस पडत आहे.क्लब चालक व पोलिसांनी ठरवुन केलेली कारवाई असल्याचे चर्चेला उधाण आले आहे.



