नाशिक ग्रामीण

निफाड तालुक्यात १८ वर्षीय युवकाची आत्महत्या; गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद:- देवगाव (ता. निफाड) येथे एका १८ वर्षीय युवकाने राहत्या घरात छतावरील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिस पाटील सुनिल बोचरे यांनी समक्ष खबर दिली की, यातील यातील इसम राकेश गोरख पवार वय १८ वर्ष रा.इंदिरानगर देवगाव
याने दिनांक ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३०
वाजेच्या सुमारास राहते घरात छतावरील फॅनला साडीचे साहाय्याने गळफास घेतला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक मोहन पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन त्यास ग्रामीण रुग्णालय लासलगाव येथे उपचाराकामी दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास तपासुन मयत घोषित केले. सदर घटनेची लासलगाव पोलिस ठाण्यात अ.मृ रजि नंबर ११/२०२६ भा.न्या.संहिता कायदा २०२३ चे कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. स.पो.नि.भास्करराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा.औदुंबर मुरडनर अधिक तपास करीत आहेत.

 

 

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!